शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

झारखंड: करमा विसर्जनादरम्यान मोठी दुर्घटना, सात मुलींचा बुडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2021 23:16 IST

Jharkhand News: झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे.

रांची - झारखंडमधील लातेहार जिल्ह्यात मोठी दुर्घटना घडला आहे. येथे करमा विसर्जनादरम्यान, तलावात बुडाल्याने सात मुलींचा मृत्यू झाला आहे. ही घटना बालूमाथ ठाणे क्षेत्रातील मननडीह गावात घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दरम्यान, या दुर्घटनेनंतर संपूर्ण गावात शोकाचे वातावरण आहे. (Seven girls drowned in Karma immersion accident in Jharkhand )

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी रात्री गावामध्ये करमा पूजन झाल्यानंतर गावातील  लोक करमा विसर्जन करण्यासाठी तलावात गेले होते. त्यावेळी तलावात आंघोळ करत असताना सात मुली खोल पाण्यात गेल्या. तेव्हा तिथे असलेल्या महिलांनी आरडा ओरडा केला. तेव्हा तिथे असलेल्या लोकांनी तलावात उड्या घेत तीन मुलींना बाहेर काढले. मात्र त्यांचा आधीच मृत्यू झाला होता. तर त्यानंतर गावकरी चार मुलींना घेऊन रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी या सर्वांना मृत घोषित केले.

या घटनेबाबत लातेहारचे उपायुक्त अबू इम्रान यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्यांच्यावतीने या घटनेच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. लातेहारच्या डीसींनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार सात मृत मुलींमध्ये तीन बहिणींचा समावेश आहे. या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या मुलींची नावे पुढील प्रमाणे आहेत. रेखा कुमारी, लक्ष्मी कुमारी, रीना कुमारी, मीना कुमारी, पिंकी कुमारी, सुषमा कुमारी आणि सुनिता कुमारी.

झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, लातेहार जिल्ह्यातील शेरेगाडा गावामध्ये करम डाली विसर्जनादरम्यान ७ मुलींचा मृत्यू झाल्याचे ऐकून मला धक्का बसला आहे. ईश्वराने दिवंगत मुलींच्या आत्म्याला शांती प्रदान करावी. या दु:खाचा आघात सहन करण्याची शक्ती ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना देवो. 

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेJharkhandझारखंडAccidentअपघात