विभागीय शेअर बाजारातून 7क्क् कंपन्या गायब?

By Admin | Updated: August 8, 2014 02:09 IST2014-08-08T02:09:41+5:302014-08-08T02:09:41+5:30

कंपनी व्यवहार मंत्रलय आणि विभागीय स्टॉक एक्स्चेंजकडील आकडेवारीनुसार एक्स्चेंजवर नोंद झालेल्या सुमारे 700 कंपन्यांचा थांगपत्ता नसल्याचे उघड झाले आहे.

Seven companies disappeared from the departmental stock market? | विभागीय शेअर बाजारातून 7क्क् कंपन्या गायब?

विभागीय शेअर बाजारातून 7क्क् कंपन्या गायब?

>मुंबई : कंपनी व्यवहार मंत्रलय आणि विभागीय स्टॉक एक्स्चेंजकडील आकडेवारीनुसार एक्स्चेंजवर नोंद झालेल्या सुमारे 700 कंपन्यांचा थांगपत्ता नसल्याचे उघड झाले आहे. या कंपन्यांच्या अधिकृत पत्त्यावर कोणतीही माहिती मिळालेली नाही. अधिकृत सरकारी आकडेवारीनुसार मात्र नाहीशा झालेल्या कंपन्यांचा आकडा फक्त 87 एवढा आहे.
या कंपन्यांकडून स्टॉक एक्स्चेंजलाही दीर्घकाळापासून कोणताही पत्रव्यवहार झालेला नाही. गुंतवणूकदार संघटनेने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार या कंपन्यांचे एकत्रित मूल्य 29 हजार कोटी रुपये एवढे आहे.
नाहीशा झालेल्या कंपन्या म्हणजे अशा कंपन्या ज्यांनी प्राथमिक भागविक्रीच्या माध्यमातून गुंतवणूकदारांकडून रक्कम गोळा केली आणि नंतर त्यांची कोणतीही माहिती मिळू शकत नाही.
कंपनी मंत्रलयाची समन्वय आणि देखरेख समिती व सेबीसह रिझव्र्ह बँक यावर लक्ष ठेवून आहे. गेल्या दोन दशकांत देशात अशा प्रकारच्या कंपन्या उघड झाल्या नव्हत्या. मात्र, सीएमसीच्या मागच्या बैठकीतील नोंदीनुसार समितीच्या अध्यक्षांनी अशा कंपन्यांचा आकडा वाढत असल्याचे म्हटल्याचे पुढे आले आहे. विभागीय स्टॉक एक्स्चेंजवर अशा कंपन्या असल्याचे यात म्हटले. 
ताळेबंद मांडण्यात त्रुटी असणा:या 2 हजार 397 कंपन्या असून, यातील 1 हजार 12 कंपन्यांची बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज अथवा नॅशनल स्टॉक एक्स्चेंजवर नोंद असून, उर्वरित 1 हजार 835 कंपन्यांची नोंद आहे. बीएसई अथवा एनएसईवर नोंदणी झालेल्या कंपन्यांपैकी निम्म्या कंपन्या नाहीशा झाल्या असाव्यात, असे या इतिवृत्तात म्हटले. ही बैठक गेल्या वर्षी जुलै महिन्यात झाली होती. (प्रतिनिधी)
 
 
 
राष्ट्रीय एक्स्चेंजवरील अशा कंपन्यांच्या संख्येशी तुलना करता विभागीय स्टॉक एक्स्चेंजवरील अशा कंपन्यांची संख्या कमी असली, तरी ती 700 च्या आसपास असण्याची शक्यता आहे. प्रत्यक्षात ही संख्या आणखी वाढू शकते. सीएमसीच्या गेल्या वर्षीच्या बैठकीनंतर अनेक विभागीय स्टॉक एक्स्चेंज बंद होण्याच्या मार्गावर आहेत.
 
4 या एक्स्चेंजना त्यांच्याकडे नोंद झालेल्या कंपन्यांची माहिती पाठविण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार 11 विभागीय एक्स्चेंजनी दिलेल्या माहितीनुसार नोंद झालेल्या 3 हजार 669 कंपन्यांनी नोंदणीसाठीच्या करारातील तरतुदी पूर्ण केलेल्या नाहीत.  आठ  एक्स्चेंजकडील माहितीचा यात समावेश नाही.

Web Title: Seven companies disappeared from the departmental stock market?