दिल्लीत नायब राज्यपालांचे अधिकार वाढवण्याशी संबंधित विधेयकावरून आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्ष आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं होतं. यानंतरही राष्ट्रीय राजधानी क्षेत्र दिल्ली (सुधारणा) विधेयक २०२१ लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर करण्यात आलं होतं. यामध्ये नायब राज्यपालांना जास्तीचे अधिकार देण्याची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी रविवारी या विधेयकावर स्वाक्षरी केली असून आता याचं कायद्यात रुपांतर झालं आहे. हे विधेयक केव्हापासून लागू होईल याची घोषणा गृह मंत्रालयाकडून केली जाईल.गेल्या आठवड्यात सोमवारी हे विधेयक राज्यसभेत मंजूर करण्यात आलं होतं. मागील दारातून दिल्लीतलं सरकार चालवण्याच्या हेतूनंच हे विधेयक मोदी सरकारनं आणल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. तर दुसरीकडे लोकनियुक्त सरकारच्या अधिकारांवर घाला घालण्यासाठी विधेयक मंजूर करण्यात आल्याचा थेट आरोप दिल्लीत सत्तेवर असलेल्या आम आदमी पक्षानं केला आहे. काँग्रेसच्या खासदारांनी विधेयकाला विरोध करत राज्यसभेतून सभात्याग होता. त्याच गदारोळात सरकारनं विधेयक पारित करून घेतलं गेलं.
केजरीवाल यांना झटका; केंद्राच्या दिल्ली विधेयकाचं कायद्यात रुपांतर, नायब राज्यपालांना जास्तीचे अधिकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2021 08:32 IST
National Capital Territory of Delhi (Amendment) Bill : राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली स्वाक्षरी, कायदा कधीपासून लागू होणार याची गृह मंत्रालय करणार घोषणा
केजरीवाल यांना झटका; केंद्राच्या दिल्ली विधेयकाचं कायद्यात रुपांतर, नायब राज्यपालांना जास्तीचे अधिकार
ठळक मुद्देराष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी केली स्वाक्षरीकायदा कधीपासून लागू होणार याची गृह मंत्रालय करणार घोषणा