Navitaire Server Glitch: देशातील प्रमुख विमानतळांवर बुधवारी सकाळी झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. विमान कंपन्यांच्या बुकिंग आणि चेक-इनसाठी वापरल्या जाणाऱ्या नेविटेयर या सॉफ्टवेअरचा सर्व्हर डाऊन झाल्याने दिल्ली, मुंबई आणि बेंगळुरू यांसारख्या महत्त्वाच्या शहरांतील विमान सेवा विस्कळीत झाली. सकाळी सुमारे ४३ मिनिटे हा तांत्रिक बिघाड राहिल्याने विमानतळांवर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा आणि गोंधळाचे वातावरण पाहायला मिळाले.
लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी ६:४५ ते ७:२८ च्या दरम्यान नेविटेयर प्रणालीने काम करणे बंद केले होते. हा काळ विमानतळावरील अत्यंत व्यस्त वेळ असल्याने त्याचा मोठा फटका प्रवाशांना बसला. या तांत्रिक बिघाडामुळे इंडिगो, अकासा एअर, स्पाइसजेट आणि एअर इंडिया एक्सप्रेस यांसारख्या मोठ्या विमान कंपन्यांचे कामकाज पूर्णपणे ठप्प झाले होते.
या सगळ्या गोंधळानंतर दिल्लीतील टर्मिनल ३ वर प्रवाशांची मोठी गर्दी झाली होती. चेक-इन काउंटर व्यवस्थित काम करत नसल्याने एअरलाईन्सच्या कर्मचाऱ्यांना मॅन्युअल पद्धतीने नोंदणी करावी लागली. यामुळे कामाचा वेग मंदावला आणि प्रवाशांच्या रांगा थेट विमानतळाच्या बाहेरपर्यंत पोहोचल्या. काही प्रवाशांनी संताप व्यक्त केला, तर अनेकांची विमाने हुकल्याच्या तक्रारीही समोर आल्या. मुंबईतही परिस्थिती वेगळी नव्हती. बोर्डिंग आणि चेक-इन प्रक्रिया रखडल्याने प्रवाशांमध्ये घबराट आणि अस्वस्थता पसरली होती.
'नेविटेयर' म्हणजे काय?
नेविटेयर ही एक जागतिक विमान तंत्रज्ञान कंपनी आहे. ही कंपनी विमान कंपन्यांना बुकिंग, चेक-इन आणि बोर्डिंगसाठी सॉफ्टवेअर पुरवते. जेव्हा ही प्रणाली बंद पडते, तेव्हा विमान कंपन्या प्रवाशांची माहिती डिजिटल पद्धतीने पडताळू शकत नाहीत, त्यामुळे विमानांना उशीर होतो.
सिस्टम पूर्ववत आणि दिलासा
अधिकारी आणि एअरलाईन्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ७:३० वाजेपर्यंत तांत्रिक दोष दूर करण्यात यश आले. इंडिगोने आपल्या स्तरावर २५ मिनिटांत बिघाड दुरुस्त केला, तर सकाळी ८:२५ वाजेपर्यंत संपूर्ण सिस्टीम रिस्टोर होऊन कामकाज पूर्ववत झाले. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येही दिल्ली विमानतळावर एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने ८०० हून अधिक विमानांवर परिणाम झाला होता. त्या तुलनेत आजचा बिघाड लवकर दुरुस्त झाला असला, तरी प्रवाशांच्या सुरक्षेच्या आणि सुविधेच्या दृष्टीने अशा तांत्रिक त्रुटी पुन्हा एकदा चिंतेचा विषय ठरत आहेत.
Web Summary : A Navitaire server glitch disrupted major Indian airports, causing flight delays and passenger congestion. Cities like Delhi and Mumbai faced significant disruptions. The system was restored, but concerns remain about the impact of such technical failures.
Web Summary : नेविटेयर सर्वर में गड़बड़ी के कारण भारत के प्रमुख हवाई अड्डों पर उड़ानें बाधित हुईं और यात्रियों को परेशानी हुई। दिल्ली और मुंबई जैसे शहरों में भारी व्यवधान हुआ। सिस्टम बहाल कर दिया गया, लेकिन ऐसी तकनीकी विफलताओं के प्रभाव के बारे में चिंता बनी हुई है।