धक्कादायक! सीरमचे ५ कोटी कोरोना डोस पडून; शासकीय आदेशाच्या दिरंगाईचा फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2021 11:45 AM2021-02-04T11:45:53+5:302021-02-04T11:56:06+5:30

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने विकसीत केलेल्या कोव्हीशील्ड लशीचे जवळपास ५.५ कोटींहून अधिक डोस प्रयोगशाळेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर

Serum Institute Sits on 55 Million Covishield Doses Awaiting Government Call | धक्कादायक! सीरमचे ५ कोटी कोरोना डोस पडून; शासकीय आदेशाच्या दिरंगाईचा फटका

धक्कादायक! सीरमचे ५ कोटी कोरोना डोस पडून; शासकीय आदेशाच्या दिरंगाईचा फटका

googlenewsNext

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटने ( serum institute of india ) विकसीत केलेल्या कोव्हीशील्ड (covishield) लशीचे जवळपास ५.५ कोटींहून अधिक डोस प्रयोगशाळेतच पडून असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शासकीय आदेशाच्या दिरंगाईमुळे हे डोस अजूनही सीरममध्येच पडून आहेत, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे. या दिरंगाईमुळे केंद्र सरकारने स्वत:हून जाहीर केलेल्या पहिल्या टप्प्यातील ३.३ कोटी जनतेच्या लशीकरणाचे लक्ष्य गाठणे देखील शक्य होणार नाही. दरम्यान, सीरमने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यास टाळले आहे. पण सुत्रांच्या माहितीनुसार कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीकडून (सीआयआय) न वापरलेले लशीचे डोस सरकारने खरेदी करावेत आणि त्यांचा वापर करावा यासाठी जोरदार लॉबिंग केले जात आहे. (Serum Institute Sits on 55 Million Covishield Doses Awaiting Government Call )

लस बाजारात विकण्याची कंपन्यांची इच्छा; निर्यात करण्यासही परवानगी मिळणार?

"लशीकरणाच्या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्याऐवजी सरकारने लसीकरण मोहिमेतील सर्व अडचणी आधी दूर करायला हव्यात", असं सीआयआयच्या सुत्रांनी सांगितलं. "ज्याप्रमाणे याआधी कोणत्याही खासगी लॅबकडून चाचण्या घेण्यात येणार नाहीत असा आग्रह करुन सुरुवातीच चाचण्या मोठ्या प्रमाणावर घेण्यास उशीर केला. त्याचप्रमाणे आता लसीकरणाच्या व्यवस्थापनाच्याबाबतीत गोंधळ निर्माण केला जात आहे", असंही एका अधिकाऱ्यानं सांगितलं. 

सीरम इंस्टिट्यूटचा मोठा करार; फिलीपींस सरकारला ३ कोटी कोविशिल्ड लसीचा पुरवठा करणार

SII ही पुण्यातील संस्था असूनही महाराष्ट्र सरकारलादेखील पुरेसे लसीचे डोस मिळाले नसल्याचं सांगण्यात येत आहे. महाराष्ट्र सरकारने आणखी डोस मिळण्याची अपेक्षा केली आहे. पण याबाबतची अधिकृत माहिती देणं टाळण्यात आलं आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात सीरमने २० लाख डोस पाठवले. 
३ जानेवारी रोजी ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडियानं (डीजीसीआय) देशात कोव्हॅक्सीन आणि कोव्हीशील्ड लशीला तात्काळ वापरासाठी मंजुरी दिली. पण कोव्हॅक्सीनच्या संपूर्ण चाचण्या झाल्या असल्याची टीका देखील याआधी करण्यात आली होती. दरम्यान, भारत बायोटकनं या सर्व चर्चा आणि दावे फेटाळून लावले आहेत.     

Web Title: Serum Institute Sits on 55 Million Covishield Doses Awaiting Government Call

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.