शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
2
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
3
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
4
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
5
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
6
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
7
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
8
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
9
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
10
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
11
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
12
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
13
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
14
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
15
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
16
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
17
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
18
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
19
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
20
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...

Serum Institute च्या अदर पूनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा; गृहमंत्रालयाचा मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2021 9:14 PM

अदर पूनावाला यांना संपूर्ण देशात मिळणार सुरक्षा. अदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूत देशात तयार करत आहे कोरोना प्रतिबंधात्मक लस.

ठळक मुद्देअदर पूनावाला यांना संपूर्ण देशात मिळणार सुरक्षाअदर पूनावाला यांची सीरम इन्स्टिट्यूत देशात तयार करत आहे कोरोना प्रतिबंधात्मक लस

केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पूनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांना ही  Y दर्जाची सुरक्षा संपूर्ण देशभरात पुरवली जाईल. बुधवारी केंद्रीय गृहमंत्रालयाने या संदर्भातील अधिसूचना जारी केली. या अंतर्गत सिक्युरिटी फोर्सेसचे ११ जवान त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असतील. यापैकी एक किंवा दोन कमांडोदेखील असतील. सध्या देशात कोरोना प्रतिबंधात्मक कोविशिल्ड या लसीचं उत्पादन सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाकडून केलं जात आहे.केंद्र सरकारकडून पूनावाला यांना व्हाय दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय अशावेळी घेण्यात आलाय जेव्हा १ मे पासून देशात कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात होणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया ही भारतातील सर्वात मोठी कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा पुरवठा करणारी कंपनी आहे. सध्या देशात मोठ्या प्रमाणात सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड या लसीचा वापर केला जात आहे. या शिवाय भारत बायोटेकही आपल्या कोव्हॅक्सिन या लसीचा पुरवठा करत आहेत. या दोन्ही कंपन्यांची लसीकरण मोहिमेत मोलाची भूमिका आहे.अदर पूनावाला यांना सीआरपीएफद्वारे सुरक्षा पुरवली जाणआर आहे. देशभरात सर्वत्र त्यांना सुरक्षा पुरवली जाणार आहे. बुधवारीच अदर पूनावाला यांनी आपल्या कोविशिल्ड या लसीचे दर कमी करणार असल्याची घोषणा केली होती. राज्य सरकारांना आता लसीच्या प्रत्येक डोससाठी ४०० रूपयांऐवजी ३०० रूपये मोजावे लागणार आहेत. 

टॅग्स :Adar Poonawallaअदर पूनावालाcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसHome Ministryगृह मंत्रालय