हरयाणा कॅडरमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी वाय. पूरन कुमार यांनी स्वत:वर गोळ्या झाडून घेत जीवन संपल्याने राज्यातील शासकीय आणि प्रशासकीय यंत्रणामध्ये खळबळ उडाली आहे. त्यांच्या निधनानंतर आता आयएएस असलेल्या त्यांच्या पत्नी अमनीत पी. कुमार यांनी हरयाणाच्या डीजीपींसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप करत तक्रार नोंदवली आहे.
वाय. पूरन कुमार यांनी टोकाचं पाऊल उचलत जीवन संपवलं तेव्हा अमनीत कु्मार ह्या हरयाणाचे मुख्यमंत्री नायाब सिंह सैनी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळासह जपाच्या दौऱ्यावर गेल्या होत्या. बुधवारी त्या हरयाणामध्ये परतल्या. त्यांनी पतीचं शवविच्छेदन थांबवलं आहे. तसेच जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत शवविच्छेदन होऊ देणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे.
वाय. पूरन कुमार यांच्या पत्नी अमनीत कुमार यांनी आपल्या तक्रारीमध्ये हरयाणाचे डीजीपी शत्रुजीत सिंह कपूर आणि रोहतकचे एसपी नरेंद्र बिजारनिया यांच्याविरोधात बीएनएश कलम १०८, आणि एससी एसटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच माझ्या पतीचा सातत्याने जातिगत भेदभाव, मानसिक छळ आणि प्रशासकीय पक्षपात करण्यात आला, असा आरोप त्यांनी केला आहे.
Web Summary : Wife of deceased IPS officer accuses Haryana DGP and SP of caste discrimination, mental harassment, and administrative bias, demanding justice before autopsy.
Web Summary : मृतक आईपीएस अधिकारी की पत्नी ने हरियाणा के डीजीपी और एसपी पर जातिगत भेदभाव, मानसिक उत्पीड़न और प्रशासनिक पक्षपात का आरोप लगाया, और पोस्टमार्टम से पहले न्याय की मांग की।