सराईत गुन्हेगार भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या (सिडीसाठी)

By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:18+5:302014-05-11T00:04:18+5:30

टोळी युद्धाचा भडका : गोळ्या झाडून शस्त्रानेही वार : सात संशयितांविरुद्ध गुन्हा

The serial killer of the serial criminal Bhim Pagare (for CD) | सराईत गुन्हेगार भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या (सिडीसाठी)

सराईत गुन्हेगार भीम पगारे याची निघृर्ण हत्त्या (सिडीसाठी)

ळी युद्धाचा भडका : गोळ्या झाडून शस्त्रानेही वार : सात संशयितांविरुद्ध गुन्हा
नाशिक : शहरातील विविध पोलीस ठाण्यांत गुन्हे दाखल असलेला तडीपार सराईत गुन्हेगार भीम पगारे याची शुक्रवारी रात्री टोळक्याने राजीवनगर येथील भगवती चौकात गोळ्या झाडून, तसेच शस्त्राचे वार करून निर्घृण हत्त्या केली़ या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात सात संशयितांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत़ दरम्यान या हत्त्येचे कारण समजू शकलेले नसून या घटनेनंतर संतापलेल्या नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात गोंधळ घातला़ शनिवारी काही गुंडांनी शहरातील दुकानदारांना धमकावत दुकाने बंद करण्यास भाग पाडले़
याबाबत मोनिका किरण काळे (शीतल गार्डन रो-हाऊस, वरदविनायकनगर, अशोका मार्ग) यांनी दिलेल्या फि र्यादीनुसार मल्हारखान झोपडप˜ीत राहणारा भीम पगारे हा शुक्रवारी रात्री अकरा वाजेच्या सुमारास राजीवनगर परिसरातून जात होता़ त्यास संशयित किशोर बरू, योगेश शेवरे, भावड्या शेवरे, मंगेश शेवरे, रामदास चांगले, शरद चांगले, गणेश चांगले यांनी अडवले़ तो न थांबल्याने त्याच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या़ त्यापैकी एक गोळी त्याच्या मांडीला लागली. जखमी अवस्थेतही तो जीव वाचविण्यासाठी जय गणराज सोसायटीकडे पळाला़ या ठिकाणी संशयितांनी पगारेच्या छाती, पोटावर धारदार शस्त्राने वार करून गंभीर जखमी केले़
गंभीर जखमी झालेल्या भीम पगारेला ॲम्ब्युलन्समधून जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी आणल्यानंतर डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले़ हेे वृत्त कळताच मल्हारखान परिसरातील शेकडो लोकांचा जमाव जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल झाला़ या ठिकाणी नातेवाईकांनी गोंधळ, घोषणाबाजी केल्याने तणाव निर्माण झाला होता़ यावर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली होती़ संशयितांना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली़
शनिवारी दुपारी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून भाऊ अर्जुन पगारे यास आणल्यानंतर दुपारच्या वेळी मयत भीम पगारे याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले़ दरम्यान, सकाळच्या सुमारास गुंडांनी शहरातील दुकाने बळजबरीने बंद करण्यास भाग पाडले़ मल्हारखान परिसरातही पोलिसांनी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता़ भीम पगारेच्या खुनानंतर शुक्रवारी रात्रीपासून शनिवारी दुपारपर्यंत पोलीस अधिकारी व कर्मचारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून होते़ या खुनातील संशयितांच्या शोधासाठी पथके पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली़ (प्रतिनिधी)

Web Title: The serial killer of the serial criminal Bhim Pagare (for CD)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.