शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

ओबीसी आरक्षणाची १ सप्टेंबरला सुनावणी; १८ सप्टेंबरपर्यंत ठाकरे गटाला दिलासा नाही 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2023 06:32 IST

शिवसेनेतून फुटून निघालेल्या १६ आमदारांची अपात्रता तसेच निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याच्या प्रकरणी १ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. 

सुनील चावके -

नवी दिल्ली : राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळण्याच्या उद्धव ठाकरे गटाच्या आशांवर तूर्तास तरी पाणी फेरले गेले आहे. शिवसेनेतून फुटून निघालेल्या १६ आमदारांची अपात्रता तसेच निवडणूक आयोगाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या उद्धव ठाकरे गटाच्या याचिकांवर आता सर्वोच्च न्यायालयात १८ सप्टेंबर रोजी सुनावणी होणार आहे. दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्याच्या प्रकरणी १ सप्टेंबर रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या राजकारणाशी संबंधित ही तिन्ही प्रकरणे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील पीठापुढे प्रलंबित आहेत. या तिन्ही प्रकरणावरील सुनावणीसाठी १ आणि १८ सप्टेंबरच्या तारखा देण्यात आल्या असल्या, तरी त्यात आणखी पुढच्या तारखा पडण्याची शक्यता असल्याचे मत सर्वोच्च न्यायालयाचे वकील सिद्धार्थ शिंदे यांनी व्यक्त केले. राज्य शासनाला ओबीसी आरक्षणाची तिहेरी चाचणी पूर्ण करता न आल्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील ओबीसी आरक्षणाचे प्रकरण तत्कालीन सरन्यायाधीश रमणा यांनी ‘जैसे थे’ ठेवून सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या पीठाकडे वर्ग केले होते. तेव्हापासून त्यावर सुनावणी झालेली नाही. शिवसेनेच्या दोन्ही प्रकरणांवर सुनावणीसाठी ३१ जुलैची तारीख निश्चित करण्यात आली होती; पण त्या दिवशी ही प्रकरणे सुनावणीसाठी आलीच नाही. आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्यावर सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दोन आठवड्यांचा वेळ दिला होता. आता या प्रकरणाची सुनावणी १८ सप्टेंबरला होणार असल्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी या काळात कोणती कारवाई केली, याचा तपशील सुनावणीत त्यांना द्यावा लागणार आहे. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयShiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेOBC Reservationओबीसी आरक्षण