सप्ताहाच्या अखेरीस सेन्सेक्सने नोंदविली 37 अंकांची वाढ
By Admin | Updated: June 27, 2014 23:52 IST2014-06-27T23:52:24+5:302014-06-27T23:52:24+5:30
जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या पाठबळामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी 37 अंकांनी उंचावला.

सप्ताहाच्या अखेरीस सेन्सेक्सने नोंदविली 37 अंकांची वाढ
>मुंबई : जागतिक पातळीवर कच्च्या तेलाचे भाव कमी झाल्याच्या पाश्र्वभूमीवर गुंतवणूकदारांच्या पाठबळामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स शुक्रवारी 37 अंकांनी उंचावला. गेल्या दोन दिवसांत सेन्सेक्समध्ये घट नोंदली गेली होती.
बाजारातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, डेरिव्हेटिवच्या नव्या करारांमुळेही बाजाराला मदत झाली. गेल्या दोन सत्रंत 3क्6.23 अंकांची घट झालेल्या मुंबई शेअर बाजाराचा 3क् शेअर्सचा सेन्सेक्स 37.25 अंकांच्या तेजीसह 25,क्99.92 अंकांवर पोहोचला. दिवसभराच्या व्यवहारात 25,2क्9.61 या उच्च पातळीवर पोहोचला.
नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा निफ्टीही 15.6क् अंक किंवा क्.21 टक्क्यांच्या वाढीसह 7,5क्8 अंकांवर बंद झाला. दिवसभरात निफ्टी 7,482.3क् ते 7,538.75 अंकांच्या पातळीवर राहिला. एका जेनेरिक औषधास अमेरिकेची मंजुरी मिळाल्याने रॅनबॅक्सीचे शेअर 5.14 अंकांनी उंचावून 496 रुपयांवर पोहोचले.
सनफार्मा, सिप्ला, इन्फोसिस, टीसीएस, विप्रो, रिलायन्स इंडस्ट्रीज, डॉ. रेड्डीज लॅब, बजाज ऑटो तथा आयटीसीच्या शेअरमधील वाढीचाही सेन्सेक्सला लाभ झाला. अमेरिकी डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया मजबूत झाल्यानेही बाजार धारणोला बळ मिळाले.
दिवसअखेरीस सेन्सेक्सवरील 3क् शेअरमध्ये 12 ला लाभ झाला, तर अन्य 18 मध्ये घसरण नोंदली गेली. (प्रतिनिधी)