सेन्सेक्स, निफ्टीत घसरण सुरूच

By Admin | Updated: August 8, 2014 02:06 IST2014-08-08T02:06:18+5:302014-08-08T02:06:18+5:30

प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीच्या दबावाने गुरुवारीही मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 76 अंकांनी आपटला.

Sensex, Nifty continue to fall | सेन्सेक्स, निफ्टीत घसरण सुरूच

सेन्सेक्स, निफ्टीत घसरण सुरूच

>मुंबई : प्रमुख माहिती तंत्रज्ञान कंपन्यांच्या शेअर्समधील घसरणीच्या दबावाने गुरुवारीही मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 76 अंकांनी आपटला. थेट परकीय गुंतवणुकीबाबत केंद्र सरकारने काल उदारमतवादी धोरण अवलंबले असतानाच शेअर बाजारात तेजीऐवजी सलग दुस:या दिवशी घसरण नोंदली.
माहिती तंत्रज्ञान क्षेत्रतील प्रमुख जागतिक कंपनी कॉग्नीझंटने चालू आर्थिक वर्षात आपल्या व्यवहारात नरमीचा कल राहील असे संकेत दिल्याने याचा देशी आयटी कंपन्यांच्या शेअर्सवर नकारात्मक परिणाम झाला. मात्र, रेल्वेशी संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी दिसून आली. सरकारने काल रेल्वे निर्मिती क्षेत्रत थेट परकीय गुंतवणुकीला परवानगी देण्याचा निर्णय घेतला. 
मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज 7.26 अंक वा क्.3क् टक्क्यांनी घसरून 25,589.क्1 अंकांवर बंद झाला. काल यात जवळपास 243 अंकांची घसरण नोंदली होती. दिवसभरात सेन्सेक्स 25,526 अंक ते 25,778 अंकादरम्यान राहिला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 22.8क् अंक किंवा क्.3क् टक्क्यांनी घसरून 7,649.25 अंकांवर बंद झाला. दिवसभरात निफ्टी 7,63क्.4क् आणि 7,7क्8.95 अंकांदरम्यान राहिला. (प्रतिनिधी)
 
युक्रेन संकट आणखी गंभीर झाल्याने युरोपियन बाजार नरमीसह उघडला. याचाही स्थानिक बाजारावर परिणाम झाला. तेल, गॅस, टिकाऊ ग्राहकोपयोगी वस्तू बनविणा:या कंपन्यांच्या शेअर्सनी बाजार काही मर्यादेर्पयत सांभाळला, असे जाणकारांनी सांगितले.  

Web Title: Sensex, Nifty continue to fall