शहरं
Join us  
Trending Stories
1
इसकी टोपी उसके सर और उसकी...; कोकाटे आणि दत्तात्रय भरणे यांच्यातील मंत्रि‍पदाची आदलाबदली!
2
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
3
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
4
विधानसभेच्या निकालांमध्ये तफावत नाही; ईव्हीएम तपासणीनंतर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण
5
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
6
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
7
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले
8
उत्तर प्रदेशमधील मंत्र्यांनी आपल्याच सेक्रेटरीला पाठवलं तुरुंगात, कारण वाचून तुम्ही म्हणाल...
9
सरकारी नोकरी शोधणाऱ्यांसाठी उत्तम संधी, लवकरच ओआयसीएलमध्ये मोठी भरती!
10
IND vs ENG: टीम इंडियासोबत पाचव्या कसोटीत 'चिटींग'? पंच कुमार धर्मसेना यांच्यावर नेटकऱ्यांचा आरोप
11
"भगवा नाही, सनातनी किंवा हिंदुत्ववादी दहशतवाद म्हणा"; अमित शाहांचा उल्लेख करत पृथ्वीराज चव्हाणांचे गंभीर विधान
12
सात वर्षांत ४२ वेळा तिने दिला नकार, अखेर ४३व्यावेळी त्यानं केलं असं काही, नकारच देऊ शकली नाही ती
13
Shubman Gill Run Out : साईला कॉल देत गिलनं उगाच केली घाई! इंग्लंडला फुकटात मिळाली विकेट (VIDEO)
14
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजपची रणनीती! माजी खासदार-आमदारांवर सोपवली मोठी जबाबदारी
15
IND vs ENG : 'ती' साथ देणार अशा परिस्थितीत त्यानं विश्रांती घेतली; सोशल मीडियावर बुमराह झाला ट्रोल
16
आमदाराच्या कारची दुचाकीला धडक, रेल्वे पुलावरून खाली कोसळून तरुणाचा मृत्यू, मृत तरुण भाजपा नेत्याचा भाऊ  
17
बांगलादेशी मॉडेलला भारतात अटक! पोलिसांनी राहत्या घरावर टाकली धाड अन् आत जे सापडलं...
18
Anilkumar Pawar ED Raid: अनिलकुमार पवार यांना त्यांच्या आईने गिफ्ट केलेला नाशिकमधील प्लॉट जप्त
19
कृषीखातं पुन्हा धनंजय मुंडेंकडे? सह्याद्री अतिथीगृहावर भेटीगाठींना वेग!
20
निवडणूक जिंकणं कठीण की पत्नीचं मन? राघव चड्डांनी दिलं असं उत्तर, परिणीतीही झाली अवाक्

दोन सामूहिक बलात्कारांनी खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2018 03:48 IST

दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी, असाच भयंकर प्रकार हरयाणामध्ये घडला आहे. जिंद जिल्ह्यातील १५ वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून, तिची निर्घृण हत्या करण्यात आली.

कुरुक्षेत्र : दिल्लीतील निर्भया प्रकरणाची आठवण व्हावी, असाच भयंकर प्रकार हरयाणामध्ये घडला आहे. जिंद जिल्ह्यातील १५ वर्षांच्या दलित मुलीवर सामूहिक बलात्कार करून, तिची निर्घृण हत्या करण्यात आली. तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आले असून, तिचा चेहरा, डोके, छाती, हात व गुप्तांगावर जखमा असल्याचे डॉ. एस. के. दत्तरवाल यांनी सांगितले. दहावीत शिकणारी ही मुलगी ९ जानेवारीपासून बेपत्ता होती. त्याच दिवशी गावातील तरुणही बेपत्ता झाला. हे दोघेही पळून गेले असावेत, असा संशय मुलीच्या पालकांना आल्याने त्यांनी तरुणाविरोधात अपहरणाची तक्रार केली.शुक्रवारी जिंदमधील कालव्यात एका मुलीचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडला. तो त्या मुलीचा असल्याचे उघड झाले. मुलीच्या शरीरावरील जखमा पाहता तिच्यावर अमानुष अत्याचार झाल्याचे उघड झाले. पोलिसांनी चार पथकांद्वारे तपास सुरू केला असून, एका अल्पवयीन मुलाला अटक केली आहे. या घटनेमुळे हरयाणात संताप व्यक्त होत आहे. मुलगी दलित होती. संशयित तरुणही दलित आहे. त्यानेच हे कृत्य केले की अन्य कोणी केल्याचे उघड झालेले नाही.या प्रकारानंतर मुलीच्या कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. प्रकरणाची सीबीआय चौकशी करावी, कुटुंबातीलएकाला सरकारी नोकरी व निर्भया फंडामधून आर्थिक साह्य द्या, अशी मागणी त्यांनी केली. सामाजिक न्यायमंत्री कृष्णकुमार बेदी यांनी कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतरच कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेतला. बलात्कार करूनफेकून दिलेफरिदाबाद : हरयाणाच्या फरिदाबाद शहरातही २३ वर्षीय महिलेचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्यानंतर तिला रात्री सिक्री या गावापाशी फेकून देण्यात आले. ही महिला शनिवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी येत होती. ती मोबाइलवर बोलत चालली असताना मागून आलेल्या स्कॉर्पिओमधील चौघांनी तिला कारमध्ये खेचले. त्यानंतर दोन तास तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला.चंदीगड : एका १0 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी ५0 वर्षांच्या इसमाला अटक केली आहे. तो पीडितेचा लांबचा नातेवाईक असल्याचे समजते. मुलीच्या गुप्तांगात त्याने लाकडी वस्तू खुपसण्याचा प्रयत्न केला, असे पोलिसांनी सांगितले. ती मुलगी त्या वेदनेने जोरात रडू लागल्याने आईने तिला लगेच रुग्णालयात नेते. तेव्हा असा प्रकार घडल्याचे उघडकीस आले. मात्र मुलीवर बलात्कार झालेला नाही, असे तपासणीनंतर डॉक्टरांनी सांगितले. हे कुटुंब मूळचे उत्तर प्रदेशातील असून, अनेक वर्षे हरयाणात राहत आहे.आरोपींना शिक्षा व्हावी, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. रेवाडीमधील बलात्कार आणि खून प्रकरणात तीन जणांना फाशीची शिक्षा झाली आहे. महिला आणि मुलींकडून आलेली प्रत्येक तक्रार नोंदवून घ्यावी, असे निर्देश देण्यात आलेले आहेत.- ममता सिंह, पोलीस महासंचालकमहिलांविरुद्ध गुन्हे वाढले आहेत. सामाजिक आणि आर्थिक प्रश्नांमुळे महिलांना लक्ष्य केले जात आहे.- प्रीती भारद्वाज, हरयाणा राज्य महिला आयोगाच्या उपाध्यक्षाहरयाणात दररोज चार महिलांवर बलात्कारहरयाणात महिलांविरुद्धचे अत्याचार दीड वर्षात वाढले असून पोलिसांच्या ‘क्राइम अगेन्स्ट वूमेन’च्या धक्कादायक आकडेवारीनुसार, राज्यात रोज चार महिलांवर बलात्कार होत असल्याची माहिती समोर येत आहे. १ जानेवारी ते ३० नोव्हेंबर २0१७ या काळात १२३८ महिलांवर बलात्कार झाले. तर, विनयभंगाच्या २०८९ घटना घडल्या.सरकार संवेदनशील नाही; काँग्रेसचा आरोपकेंद्र सरकार महिला आणि मुलींसाठी अनेक योजना राबवित आहे. ‘बेटी बचावो, बेटी पढाओ’ यासारख्या योजना भलेही मुलींना झुकते माप देत असतील; पण, पोलिसांच्या आकडेवारीने महिलांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महिलांविरुद्धच्या अत्याचाराबाबत हे सरकार संवेदनशील नसल्याचा आरोप हरयाणा प्रदेश काँग्रेस समितीच्या महिला शाखेच्या प्रवक्त्या रंजीता मेहता यांनी केला आहे.महिलांविरुद्धचे अत्याचार(१ जानेवारी ते ३० नोव्हेंबर)प्रकरणे २०१६ २०१७हुंडाबळी २४९ २२९बलात्कार ११५६ १२३८बलात्काराचा प्रयत्न १२५ १४१विनयभंग १७१९ २०३९छेडछाड २२१ २८५अपहरण १८२२ २४३२हुंड्यासाठी छळ २९९५ ३०१०अनैतिक तस्करी ७६ ७४पीसी-पीएनडीटीकायद्याचे उल्लंघन ६६ ४५अ‍ॅसिड हल्ले ९ ५महिला तस्करी ९ १५हुंडा प्रतिबंधक ५ १०

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हा