धक्कादायक! टाटा स्टीलच्या माजी अधिकाऱ्याने केली मॅनेजरची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 14:19 IST2018-11-10T14:15:12+5:302018-11-10T14:19:55+5:30
कामावरून काढल्यामुळे संतापाच्या भरात टाटा स्टीलच्या एका माजी अधिकाऱ्याने कंपनीच्या मॅनेजरची गोळया झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

धक्कादायक! टाटा स्टीलच्या माजी अधिकाऱ्याने केली मॅनेजरची हत्या
फरीदाबाद - कामावरून काढल्यामुळे संतापाच्या भरात टाटा स्टीलच्या एका माजी अधिकाऱ्याने कंपनीच्या मॅनेजरची गोळया झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हरयाणातील फरीदाबादमध्ये ही घटना घडली. विश्वास पांडे असे आरोपीचे नाव असून हत्येनंतर तो फरार झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विश्वासला काही महिन्यांपूर्वी नोकरीवरुन काढून टाकण्यात आले होते. शुक्रवारी (9 नोव्हेंवर) दुपारच्या सुमारास कंपनीचे मॅनेजर अरींदम पाल त्यांच्या केबिनमध्ये आराम करत असताना विश्वास त्यांच्या केबिनमध्ये घुसला. पाल यांच्यावर त्याने पाच गोळ्या झाडल्या. यामध्ये पाल यांचा जागीच मृत्यू झाला.
#Haryana: Senior Manager of Tata Steel shot dead by former employee in Faridabad. Mujesar SHO says,“Bullets were shot at senior manager by a former employee.He died on the way to the hospital. In initial reports,doctors say he was shot with 5 bullets. Post-mortem reports awaited” pic.twitter.com/CNWhngKhAJ
— ANI (@ANI) November 9, 2018
विश्वास पांडे टाटा स्टीलमध्ये एक्झिक्युटिव्ह इंजिनीअर होता. अरींदम पाल यांना विश्वास पांडेच्या वर्तनामध्ये बेशिस्तपणा आढळल्याने त्यांनी त्याला नोकरीवरून काढून टाकले होते. टाटामध्ये पुन्हा नोकरी मिळावी यासाठी त्याने अनेकदा प्रयत्नही केले होते. पण त्याला यश आलं नाही. विश्वासने पाल यांना गंभीर परिणामाच्या धमक्याही दिल्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असून फरार असलेला विश्वासचा शोध घेत आहेत.