ज्येष्ठ पत्रकार अनिल शर्मा यांचे निधन

By Admin | Updated: February 7, 2017 02:06 IST2017-02-07T02:06:31+5:302017-02-07T02:06:31+5:30

ज्येष्ठ पत्रकार आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस अनिल शर्मा यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने सोमवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे निधन झाले.

Senior journalist Anil Sharma passes away | ज्येष्ठ पत्रकार अनिल शर्मा यांचे निधन

ज्येष्ठ पत्रकार अनिल शर्मा यांचे निधन

नवी दिल्ली : ज्येष्ठ पत्रकार आणि नागपूर श्रमिक पत्रकार संघाचे माजी सरचिटणीस अनिल शर्मा यांचे मूत्रपिंड निकामी झाल्याने सोमवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ते ६६ वर्षांचे होते. त्यांच्या मागे अनुभव व आभास ही दोन मुले आहेत.
अनिल शर्मा यांनी नागपूर, भोपाळ आणि नवी दिल्ली येथील अनेक वर्तमानपत्रात दीर्घकाळ काम केलेले आहे. लोकमत समूहाशी त्यांचा अतिशय घनिष्ठ संबंध होता आणि त्यांनी लोकमत समूहात दीर्घकाळ आपले योगदान दिले होते.
काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी अनिल शर्मा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

Web Title: Senior journalist Anil Sharma passes away