सॅल्यूट न ठोकल्याने वरिष्ठ आयपीएस अधिकारी वांध्यात

By Admin | Updated: July 12, 2015 23:22 IST2015-07-12T23:22:14+5:302015-07-12T23:22:14+5:30

गृहमंत्री रमेश चेन्निथला यांना सॅल्यूट न ठोकल्यामुळे केरळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ऋषिराज सिंह वांध्यात सापडले आहेत.

Senior IPS officer in Vandhya did not lock the salutes | सॅल्यूट न ठोकल्याने वरिष्ठ आयपीएस अधिकारी वांध्यात

सॅल्यूट न ठोकल्याने वरिष्ठ आयपीएस अधिकारी वांध्यात

थिरुवनंतपुरम : गृहमंत्री रमेश चेन्निथला यांना सॅल्यूट न ठोकल्यामुळे केरळचे अतिरिक्त पोलीस महासंचालक ऋषिराज सिंह वांध्यात सापडले आहेत.
शनिवारी त्रिशूरस्थित पोलीस अकादमीत महिला पोलिसांच्या पासिंग आऊट परेड कार्यक्रमास गृहमंत्री चेन्निथला उपस्थित होते. चेन्निथला कार्यक्रमस्थळी पोहोचल्याचे माईकवरून जाहीर होताच व्यासपीठावर हजर वरिष्ठ पोलीस अधिकारी त्यांच्या स्वागतासाठी उभे झाले आणि त्यांनी मंत्र्यांना सॅल्यूट केला. याचदरम्यान विशेष सेवा आणि वाहतूक प्रभारी अतिरिक्त पोलीस महासंचालक ऋषिराज सिंह सोफ्यावर बसले होते. मंत्र्यांना सॅल्यूट ठोकण्यासाठी पुढे न येता ते सोफ्यावरच बसून राहिले.

Web Title: Senior IPS officer in Vandhya did not lock the salutes