शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कुणासाठी मोडला ३८ वर्षांचा संसार? ६५ व्या वर्षी पुन्हा बोहल्यावर चढणार प्रसिद्ध वकील हरीश साळवे!

By ravalnath.patil | Updated: October 26, 2020 11:35 IST

Harish Salve : हरीश साळवे हे सुरुवातीपासूनच आपल्या कौशल्यामुळे प्रख्यात वकील आहेत. यामुळेच त्यांना भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केले होते.

ठळक मुद्देहरीश साळवे आणि मीनाक्षी साळवे जवळपास ३८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर विभक्त झाले. हरीश साळवे आणि मीनाक्षी साळवे यांना दोन मुलीही आहेत.

नवी दिल्ली : माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे पुढील आठवड्यात विवाह बंधनात अडकणार आहेत. हरीश साळवे हे देशातील नामांकित वकील आणि ब्रिटनमधील क्वीन्स कौन्सिल आहेत. ६५ वर्षीय हरीश साळवे यांनी गेल्या महिन्यात आपली पहिली पत्नी मीनाक्षी साळवे यांच्यापासून घटस्फोट घेतला. हरीश साळवे आणि मीनाक्षी साळवे जवळपास ३८ वर्षे एकत्र राहिल्यानंतर विभक्त झाले. हरीश साळवे आणि मीनाक्षी साळवे यांना दोन मुलीही आहेत. 

आता हरीश साळवे येत्या २७ ऑक्टोबरला लंडनच्या चर्चमध्ये मैत्रिण कॅरोलिन ब्रॉसर्ज यांच्याशी लग्न करणार आहेत. हरीश साळवे आणि कॅरोलिन या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. ५६ वर्षीय कॅरोलिन या कलाकार असून त्यांना एक मुलगी आहे. एका कला प्रदर्शनात हरीश साळवे यांची कॅरोलिन यांच्याशी भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये जवळीक वाढत गेली. आता दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला आहे.

हरीश साळवे हे सुरुवातीपासूनच आपल्या कौशल्यामुळे प्रख्यात वकील आहेत. यामुळेच त्यांना भारत सरकारने सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केले होते. २०१९ साली आंतरराष्ट्रीय कोर्टात पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची बाजू हरीश साळवे यांनीच मांडली होती. या प्रकरणात पाकिस्तानला त्यांनी तोंडावर पाडले होते. परंतु उल्लेखनीय म्हणजे, या केससाठी त्यांनी नाममात्र एक रुपया फी म्हणून घेतली होती. माजी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी निधनापूर्वी केवळ एक दिवस अगोदर हरीश साळवे यांना फोन करून आपली फी घेऊन जाण्याची विनंती केली होती. 

दरम्यान, सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे आणि हरीश साळवे यांचे एकाच शाळेत शिक्षण झाले आहे. दोघांनी महाराष्ट्रातील नागपूरात शिक्षण घेतले. १९७६ मध्ये हरीश साळवे दिल्लीला आले आणि शरद बोबडे हे मुंबई उच्च न्यायालयात आले. यानंतर शरद  बोबडे हे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश बनले आणि हरीश साळवे हे वरिष्ठ वकील आणि त्यानंतर सॉलिसिटर जनरल बनले.

टॅग्स :marriageलग्नLondonलंडनadvocateवकिल