शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ काँग्रेस नेते राशिद अल्वी यांनी दिला निवडणूक लढवण्यास नकार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2019 14:51 IST

लखनौ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. अल्वी यांना उत्तर ...

लखनौ - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राशिद अल्वी यांनी प्रकृती अस्वस्थ्यामुळे लोकसभा निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. अल्वी यांना उत्तर प्रदेशमधील अमरोहा मतदारसंघामधून उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान,  अल्वी यांनी आपल्या या निर्णयाची कल्पना पक्षश्रेष्ठींना दिली असून,  रशिद अल्वी यांच्याऐवजी सचिन चौधरी यांनी अमरोहा येथून उमेदवारी देण्यात आली आहे.काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या उमेदवारांच्या पहिल्या यादीत नाव नसल्याने रशिद अल्वी नाराज झाले होते. अखेरीस आठव्या यादीमध्ये त्यांना अमरोहा येथून उमेदवारी जाहीर झाली होती. अमरोहा येथून भाजपाने कंवर सिंह तंवर तर बसपाने दानिश अली यांना उमेदवारी दिली आहे. मात्र राशिद अल्वी यांनी ऐनवेळी प्रकृतीचे कारण देत निवडणूक लढवण्यास नकार दिला आहे. 

 काँग्रेसचे माजी प्रवक्ते असलेल्या राशिद अल्वी यांनी 1999 ते 2004 या काळात खासदार म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर दोन वेळा त्यांची राज्यसभेवर खासदार म्हणून नियुक्ती झाली होती. गेल्या महिन्यात उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक  जिंकण्यासाठी काँग्रेसने गठित केलेल्या समितींपैंकी जाहीरनामा समितीचे प्रमुखपद राशिद अल्वी यांच्याकडे देण्यात आले होते. काँग्रेसने उत्तर प्रदेशात चांगली कामगिरी करण्यासाठी कंबर कसली असून, पश्चिम उत्तर प्रदेशमधील चार मतदारसंघात मुस्लिम उमेदवारांना उमेदवारी दिली आहे. मुरादाबाद येथून इम्रान प्रतापगढी यांना, तर बिजनौर येथून नसीमुद्दीन सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. सहारनपूर येथून इम्रान मसूद यांना तर अमरोहा येथून राशिद अल्वी यांना उमेदवारी देण्यात आली होती. मात्र आता राशिद अस्वी यांनी माघार घेतली आहे. दरम्यान, या चारही मतदरासंघांमध्ये मुस्लिम मतदारांचे प्रमाण लक्षणीय आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसPoliticsराजकारणUttar Pradeshउत्तर प्रदेश