शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2018 10:11 IST

Gurudas Kamat Death : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन झालं आहे.

नवी दिल्ली- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांचं निधन झालं आहे. चाणक्यपुरीतील प्रायमस रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं त्यांचं निधन झालं. गुरुदास कामत काल दिल्लीत अहमद पटेल यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना भेटायला गेले होते. पटेल यांना भेटून सायंकाळी ते हॉटेलमध्ये मुक्कामाला गेले. मध्यरात्री त्यांना हार्ट अटॅक आला. तेथून त्यांना रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मुंबईमध्ये काँग्रेसला मोठं करण्यासाठी गुरुदास कामत यांनी मोलाची भूमिका बजावली होती. गेल्याच वर्षी त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. गुरुदास कामत हे सोनिया गांधी आणि राहुल गांधींच्या फारच जवळच होते.काँग्रेसनं त्यांच्याकडे गुजरात, राजस्थान, दादरा आणि नगर हवेली, दिव दमन या राज्यांची जबाबदारी सोपवली होती. गेल्या वर्षी त्यांचं मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेल्या संजय निरुपम यांच्याबरोबर वाद झाले होते. त्यामुळे त्यांनी काँग्रेसच्या सर्वच पदांचा राजीनामा दिला होता. गुरुदास कामत ब-याचदा काँग्रेसकडून लोकसभेवर खासदार म्हणून निवडून गेले होते. मुंबईतल्या पश्चिम उपनगरांत त्यांचं प्राबल्य होतं. 1972मध्ये त्यांनी विद्यार्थी चळवळीतून राजकारणात प्रवेश केला. त्यानंतर 1976ला त्यांनी एनएसयूआयचे अध्यक्षपदही भूषवलं. 1984ला ते पहिल्यांदा काँग्रेसकडून लोकसभेवर निवडून गेले. 2009 ते 2011मध्ये यूपीए सरकारमध्ये राज्यमंत्री होते. तसेच त्यांनी केंद्रीय गृहखातं आणि दूरसंचार मंत्रालयाचा अतिरिक्त भारही सांभाळला होता. 2014च्या निवडणुकीत शिवसेनेच्या गजानन कीर्तिकरांकडून त्यांचा पराभव झाला होता.गुरुदास कामत यांचं निधन झालेल्या प्रायमस रुग्णालयात सोनिया गांधी पोहोचल्या आहेत.  

टॅग्स :Gurudas Kamatगुरुदास कामतcongressकाँग्रेस