शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांच्या मुलाचा अपघात; सून चित्रा यांचा मृत्यू, मानवेंद्र गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 19:22 IST

माजी खासदार मानवेंद्र सिंह हे त्यांच्या पत्नीसह भाजपा सोडून २०१८ मध्येच काँग्रेसमध्ये दाखल झाले.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी परराष्ट्र मंत्री जसवंत सिंह यांचा मुलगा मानवेंद्र सिंह आणि त्यांची पत्नी चित्रा सिंह यांच्या गाडीचा अल्वरमध्ये अपघात झाला. जसवंत सिंह यांची सून चित्रा सिंह यांचा अपघातातमृत्यू झाला आहे. माजी खासदार मानवेंद्र सिंह हे त्यांच्या पत्नीसह भाजपा सोडून २०१८ मध्येच काँग्रेसमध्ये दाखल झाले. मानवेंद्र त्यांच्या मुलासह गंभीर जखमी झाले असून दोघांवर उपचार सुरू आहेत.

मंगळवारी सायंकाळी दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गावर हरयाणा सीमेजवळील अलवरच्या नौगाव जवळ खुशपुरी येथे हा अपघात झाला. या अपघातात बारमेरचे माजी खासदार मानवेंद्र यांच्या पत्नी चित्रा सिंह यांचा मृत्यू झाला. मानवेंद्र सिंह यांच्याशिवाय त्यांचा मुलगा हमीर सिंह देखील जखमी झाला आहे. मानवेंद्र सिंह यांचा मुलगाही कारमध्ये प्रवास करत होता. दोन्ही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना अलवर येथील सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, मानवेंद्र सिंह पत्नी आणि मुलासह दिल्लीहून जयपूरला निघाले होते, मात्र अचानक त्यांची कार डिव्हायडरला धडकली. खरं तर हा अपघात नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. या अपघातात त्यांच्या पत्नीला जीव गमवावा लागला, तर मुलगा हमीर सिंह याच्या शरीरावर अनेक ठिकाणी गंभीर जखमा झाल्या. नाकावर व चेहऱ्यावर देखील जखमा आहेत.

माजी खासदार मानवेंद्र हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर अलवर येथील सरकारी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल झाले आहेत. रुग्णालयात भाजपा आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांचे स्थानिक नेते उपस्थित असल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Rajasthanराजस्थानDeathमृत्यूAccidentअपघात