शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
3
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
4
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
5
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
6
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
7
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
8
साधी राहणी अन् कोट्यवधींची मालमत्ता! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह वादाच्या भोवऱ्यात
9
फॅमिली कार घ्यायचीय? ८.८० लाखांची ही ७ सीटर पडली सर्वांवर भारी! टोयोटा आणि महिंद्राला मागे टाकत ठरली नंबर १; पाहा टॉप-१० यादी
10
दक्षिण चीन सागरात १७ हजार सैनिक का जमले?; चीनच्या वर्चस्वाला थेट आव्हान देण्याची ७ देशांची तयारी
11
"आशाई, हे तात्पुरतं 'गुडबाय'! पण मला माहितीये..."; आशा भोसलेंची नात जनाईची भावूक पोस्ट
12
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
13
लग्नाचा मांडव की लुटीचा अड्डा? 'लुटेरी दुल्हन'चा थरार; अशी करायचे फसवणूक
14
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
15
एसी लोकल सांगाड्यापासून नॉन एसी गाड्या, कुर्ला कारशेडमध्ये दाखल, ५,७०० प्रवासी करू शकतील प्रवास
16
पराभवांतून धडा घ्या किंवा एकटे पडून राहा! सलग तिसऱ्या पराभवानंतर कर्णधार हार्दिक संतापला
17
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
18
Video - १२ महिन्यांत फेडलं ८० लाखांचं कर्ज; अमेरिकेतील भारतीय तरुणीच्या कर्तृत्वाने जग अवाक
19
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
20
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
Daily Top 2Weekly Top 5

फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवा - आरएसएस

By admin | Updated: April 24, 2015 15:53 IST

सरकारने फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे अशा शब्दांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आपली नाराजी व्यक्त केली आहे.

ऑनलाइन लोकमत
जम्मू, दि. २४ - सरकारने फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे असे सांगत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने  फुटीरतावाद्यांनी काश्मीरमध्ये पाकिस्तानी ध्वज नाचवत पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिल्याच्या घटनेबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.  'जे लोक पाकिस्तानाच्या समर्थनार्थ घोषणा देत आहेत, त्यांना , विशेषत: फुटीरतावादी नेते आणि त्यांच्या कुटुंबियांना भारत सरकारने इथे राहण्याची परवानगी देता कामा नये' असे संघाचे वरिष्ठ नेते इंद्रेश कुमार यांनी म्हटले आहे. ' यामुळे काश्मीरमधील लोकांच्या जीवनात शांतता व समृद्धी राहील. भारत सरकारने सर्व फुटीरतावाद्यांना पाकिस्तानात पाठवले पाहिजे', असेही त्यांनी सांगितले. 
इंद्रेश कुमार हे मुस्लिम राष्ट्रीय मंचाचे  (एमआरएम) संरक्षकही आहेत. एमआरएम मंचाच्या जम्मू -काश्मीर युनिटतर्फे आयोजित करण्यात आलेल्या 'देशापुढील समस्या आणि त्यातील भारतीय मुस्लिमांची भूमिका ' या 'सेमिनारमध्ये बोलताना इंद्रेश कुमार यांनी हे मत व्यक्त केले. ' देशाचा व येथील लोकांच्या चांगुलपणामुळेच पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देऊनही या लोकांना इथल्या भूमीवर रहायला मिळत आहे, पण यापुढे हे खपवून घेतले जाणार नाही, असे कुमार म्हणाले. 
'सरकारने विकासावर लक्ष द्यावे आणि जनादेशाचा आदर राखावा' असा सल्ला कुमार यांनी जम्मू- काश्मीरचे मुख्यमंत्री मुफ्ती मोहम्मद सईद यांना यावेळी दिला.  'पर्यटन, शिक्षण, आरोग्य यासह सर्व क्षेत्रातील विकासासह राज्यात सर्वत्र शांतता नांदेल याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे, असे कुमार म्हणाले.