एकाच्या घराची दुसर्‍यालाच विक्री खोटे खरेदीखताने घरमालकाची फसवणूक

By Admin | Updated: June 15, 2015 21:29 IST2015-06-15T21:29:42+5:302015-06-15T21:29:42+5:30

पुणे : कोरेगाव पार्क येथील श्री गणगजानन सहकारी गृहरचनेतील एका सदनिकेचे खोटे खरेदीखत तयार करून ती सदनिका अन्य एकाला विकल्याप्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली.

Selling one's house to another is fraudulently deceived by the homeowner's fraud | एकाच्या घराची दुसर्‍यालाच विक्री खोटे खरेदीखताने घरमालकाची फसवणूक

एकाच्या घराची दुसर्‍यालाच विक्री खोटे खरेदीखताने घरमालकाची फसवणूक

णे : कोरेगाव पार्क येथील श्री गणगजानन सहकारी गृहरचनेतील एका सदनिकेचे खोटे खरेदीखत तयार करून ती सदनिका अन्य एकाला विकल्याप्रकरणी सोसायटीच्या अध्यक्षाला कोरेगाव पार्क पोलिसांनी अटक केली.
शिवाजी यशवंत ताडे (रा. घोरपडी क्वार्टर्स) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अभिजित जगन्नाथ बिडकर (वय ४०, रा. सेंट पॅट्रीक टाऊन गेट, हडपसर )यांनी फिर्याद दिली आहे. संजीव तुकाराम कवडे (रा. घोरपडी गाव), समीर बशीर जमादार (रा. आर्शिवाद अपार्टमेंट, लुल्लानगर), विकास गाडपल्ली (रा. खडकी बाजार), सुशील लोहकरे (रा. नाना पेठ) यांचा पोलिस शोध घेत आहेत.
बिडकर यांच्या फिर्यादीनुसार, कोरेगाव पार्क येथे श्रीगणगजानन सहकारी गृहरचना संस्थेत त्यांच्या मालकीची १० क्रमांकाची सदनिका आहे. ही सदनिका अध्यक्ष ताडे यांच्यासह इतर आरोपींनी संगनमत करून त्याचे खोटे खरेदीखत तयार केले व त्याची नोंदणी केली व ती सदनिका समीर जमादार यांस विकून त्या सदनिकेच्या सातबारा सदरी त्याच्या नावाची नोंद करून फिर्यादीची फसवणूक केली.

Web Title: Selling one's house to another is fraudulently deceived by the homeowner's fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.