... म्हणून भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर हाेणे आवश्यक - राजनाथ सिंह
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 18, 2023 09:02 IST2023-06-18T08:53:21+5:302023-06-18T09:02:08+5:30
१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी भारताला शस्त्रसाठा देण्यास अनेक देशांनी नकार दिला होता.

... म्हणून भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर हाेणे आवश्यक - राजनाथ सिंह
लखनौ : जागतिक घडामोडी लक्षात घेता भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भर हाेणे आवश्यक आहे. आत्मनिर्भरता हा पर्याय नसून ती देशाची गरज असल्याचे मत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केले. लखनौ येथे आयोजित आत्मनिर्भर भारत कार्यक्रमात ते बोलत होते.
१९७१च्या भारत-पाकिस्तान युद्धावेळी भारताला शस्त्रसाठा देण्यास अनेक देशांनी नकार दिला होता. ज्यावेळी आम्हाला गरज होती, तेव्हा काही देश आम्हाला शांततेचा संदेश देत होत, असे सिंह म्हणाले.