शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

Seemanchal Express : सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2019 12:39 IST

Seemanchal Express Accident : बिहारमधील सहदेई बुजुर्ग येथे मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे.  जोगबनी-आनंद विहार टर्मिनल सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देसीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे घसरले, 7 जणांचा मृत्यूरेल्वे दुर्घटनेत अनेक जण जखमीपहाटेच्या सुमारास झाला अपघात, दुर्घटनेमागील कारण अस्पष्ट

पाटणा - बिहारमधील सहदेई बुजुर्ग येथे मोठी रेल्वे दुर्घटना घडली आहे.  जोगबनी-आनंद विहार टर्मिनल सीमांचल एक्स्प्रेसचे 11 डबे रुळावरुन घसरले आहेत. यामध्ये 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 24 जण जखमी झाले आहेत. मृत आणि जखमींचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी रेल्वे दुर्घटनेबाबत दुःख व्यक्त केले आहे. रविवारी (3 फेब्रुवारी) पहाटे 3.58 वाजेच्या दरम्यान हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे.  ही एक्स्प्रेस जोगबनीहून दिल्लीच्या दिशेनं प्रवास करत होती. या भीषण दुर्घटनेप्रकरणी रेल्वे प्रशासनाकडून चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. घटनास्थळावर सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे.  

एनडीआरएफची टीम आणि रेल्वे प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळावर हजर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे रुळाला मोठा तडा गेला आहे. मात्र अपघातामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अपघातात जखमी झालेल्या अनेकांची प्रकृती गंभीर आहे. दुर्घटना घडली त्यावेळेस काळोख असल्याच्या कारणामुळे मदत आणि बचाव कार्य उशिराने सुरू झाले, अशी माहिती समोर आली आहे. 

दुसरीकडे, रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनीही ट्विट करत दुर्घटनेबाबतची माहिती दिली. 

मृतांच्या कुटुंबीयांना  4 लाख रुपये आणि जखमींना 50,000 रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा.

 

 

रेल्वे प्रशासनाकडून हेल्पलाइन जारीसोनपूर - 0615822164 हाजीपीर - 06224272230 बरौनी- 06279232222 पाटणा  - 06122202290, 06122202291, 06122202292, 06122213234

 

टॅग्स :AccidentअपघातIndian Railwayभारतीय रेल्वेDeathमृत्यू