शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

सीमा हैदर घुसखोरी प्रकरणी मोठी अपडेट! SSB ने केली धडक कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2023 10:43 IST

सीमा हैदरचा भारतातील प्रवेश हे एक कोडंच होऊन बसलं आहे

Seema Haider Update: पाकिस्तानी महिला सीमा हैदर हे भारतीय तपास यंत्रणांसाठी आतापर्यंत न सुटलेले कोडं आहे. सीमा हैदर तिच्या चार मुलांसह भारतात कशी आली याचा तपास सुरू आहे. या दरम्यान, एसएसबीने आपल्या दोन जवानांना निलंबित केले आहे. सीमा आणि तिची मुले नेपाळमार्गे भारतीय हद्दीत घुसलेल्या बसची या दोन जवानांनी तपासणी केल्याचे वृत्त होते. मिळालेल्या माहितीनुसार, SSB च्या 43 व्या बटालियनचे इन्स्पेक्टर सुजित कुमार वर्मा आणि हेड कॉन्स्टेबल चंद्र कमल कलिता यांना निलंबित करण्यात आले आहे. दोन्ही जवानांवर निष्काळजीपणाच्या आरोप ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे.

SSB ने कडक कारवाई केली

सीमा हैदर नेपाळमार्गे भारतात आली होती. भारत आणि नेपाळची सीमा खुली आहे आणि तिचे रक्षण एसएसबी म्हणजेच सशस्त्र सीमा बल करते. त्यामुळेच सीमा हैदरच्या भारतात प्रवेशाची एसएसबी चौकशी करत होती. याप्रकरणी दोन्ही जवानांचा निष्काळजीपणा समोर आल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

सीमा राजकारणाच्या मैदानात उतरणार?

सीमा तपास यंत्रणांच्या रडारवर आहे. तिची आणि सचिनची प्रेमकहाणी अजूनही चर्चेत आहे. यातच, सीमा हैदर राजकारणाच्या मैदानात नवी इनिंग सुरू करणार असल्याची बातमी पसरली आहे. एनडीएचा मित्रपक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाने आणि केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी सीमा हैदर यांना पक्षात येण्याचे निमंत्रण दिल्याचे सांगण्यात आले. सीमा हैदरने हे निमंत्रण स्वीकारले असून ती निवडणुकीच्या मैदानात उतरू शकते, असे बोलले जात आहे. मात्र, हे प्रकरण चर्चेत येण्याआधीच रामदास आठवलेंचा खुलासा समोर आला. पक्षाचा असा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सीमा हैदर यांना पक्षात घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यांना तिकीट द्यायचेच असेल तर आम्ही त्यांना भारतातून पाकिस्तानचे तिकीट देऊ, मात्र येथे पक्षाचे तिकीट देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ते म्हणाले.

टॅग्स :Pakistanपाकिस्तानNepalनेपाळIndiaभारत