शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

मोदींवरील चित्रपटाचा ट्रेलर पाहून विवेक ओबेरायची उडविली खिल्ली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2019 5:57 AM

ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, ५ एप्रिल रोजी, नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित होत असून, त्याचा ट्रेलर रीलिज होताच सोशल मीडियावरून त्याची खिल्ली उडविली जात आहे.

नवी दिल्ली  - ऐन लोकसभा निवडणुकांच्या तोंडावर, ५ एप्रिल रोजी, नरेंद्र मोदी यांच्यावरील चित्रपट प्रदर्शित होत असून, त्याचा ट्रेलर रीलिज होताच सोशल मीडियावरून त्याची खिल्ली उडविली जात आहे. निवडणुकांच्या काळात नरेंद्र मोदींवरील चित्रपट प्रदर्शित करण्यास बंदी घालावी, अशी मागणी काही राजकीय पक्षांनी केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळावर हा चित्रपट असल्याने त्याचे नाव ‘पीएम नरेंद्र मोदी’ का, असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे.चित्रपटात मोदी यांची भूमिका अभिनेता विवेक ओबेराय याने केली असून, तो कोणत्याही अँगलमधून नरेंद्र मोदींसारखा दिसत नाही, असा आक्षेप बऱ्याच जणांनी घेतला. विवेकपेक्षा मोदी हेच अधिक चांगले अभिनेते आहेत, असा काहींनी टोला लगावला. मोदी आता प्रचारासाठी चित्रपटाचाही वापर करू लागले, असेही टिष्ट्वट एकाने केले.ट्रेलर पाहिल्यावर दूरदर्शनवरील लो बजेट मालिकांची आठवण येते, असे एकाने टिष्ट्वट केले आहे. त्यांची (मोदी यांची) डिग्री नकली निघाली होती, पण हा चित्रपटही नकली दिसतोय, असे दुसऱ्याने टिष्ट्वट केले. हा चित्रपट म्हणजे २0१९ सालचा विनोदी चित्रपट (बेस्ट कॉमेडी आॅफ २0१९) असेल, अशी प्रतिक्रिया एकाने व्यक्त केली. अनेकांनी चित्रपटाच्या ट्रेलरमधील विवेकच्या छायाचित्रावर ‘चौकीदार चोर हैं’ अशी प्रतिक्रिया लिहिली आहे.काहींनी विवेकच्या ‘ग्रेट ग्रँड मस्ती’ चित्रपटाचे पोस्टर या ट्रेलरच्या निमित्ताने टिष्ट्वट केले. एकाने या चित्रपटाची तुलना सध्या तुरुंगात असलेल्या बाबा राम महिमशी केली. एकाने म्हटले आहे की, हा चित्रपट लवकरात लवकर प्रदर्शित करावा. ज्यांनी मते कोणालाद्यायची, हे अद्याप ठरवलेले नाही,तेही हा चित्रपट पाहून भाजपाला सत्तेतून बाहेर घालवतील. एकाने तर विवेक ओबेराय कायमच गँगस्टरची भूमिका उत्तम करतात, असा टोला लगावला आहे.या चित्रपटात मी गाणी लिहिलेली नाहीत. ट्रेलरच्या शेवटी माझे नाव पाहून मी चकित झालोय, अशी प्रतिक्रिया गीतकार जावेद अख्तर यांनी दिली आहे. हे टिष्ट्वट करताना त्यांनी ट्रेलरच्या शेवटची नामावलीही दिली आहे.आचारसंहितेचा भंग?हा चित्रपट ५ एप्रिल रोजी प्रदर्शित केल्यास आचारसंहितेचा भंग होईल, असे काही राजकीय पक्षांनी म्हटले आहे, पण चित्रपट कधी प्रदर्शित करावा, यावर निवडणूक आयोगाची बंधने नाहीत, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी म्हणाले आहे. द्रमुकने तर निवडणुका होईपर्यंत हा चित्रपट प्रदर्शित करण्यास आयोगाने मंजुरी देऊ नये, अशी मागणी केली आहे.इथे आहे पत्रकार परिषद?पंतप्रधान मोदी यांनी गेल्या पाच वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतलेली नाही. या ट्रेलरवर प्रतिक्रिया देताना एकाने म्हटले आहे की, किमान या चित्रपटात तरी मोदी यांची एखादी पत्रकार परिषद दाखविली असेल, अशी आशा करू या!

टॅग्स :Vivek oberoyaविवेक ऑबेरॉयNarendra Modiनरेंद्र मोदी