सुरक्षा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसते गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांचा प्रियंका गांधींना टोला
By Admin | Updated: June 2, 2014 19:05 IST2014-06-02T18:52:08+5:302014-06-02T19:05:16+5:30
नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांनी विमानतळावर सुरक्षा तपासातून आपल्या कुटुंबाला मिळालेली सवलत काढून घेण्याची सूचना एसपीजीला केल्याच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सुरक्षा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसते, असा टोला हाणला.

सुरक्षा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसते गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांचा प्रियंका गांधींना टोला
नवी दिल्ली : प्रियंका गांधी यांनी विमानतळावर सुरक्षा तपासातून आपल्या कुटुंबाला मिळालेली सवलत काढून घेण्याची सूचना एसपीजीला केल्याच्या पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी सुरक्षा कुणाच्या मर्जीवर अवलंबून नसते, असा टोला हाणला.
रिजीजू यांनी प्रियंका गांधी यांचा नामोल्लेख न करता म्हणाले की, कुणीही सुरक्षेचे राजकारण करायला नको.
प्रियंका गांधी यांनी आपल्या कुटुंबाला विमानतळावर सुरक्षा तपासातून मिळत असलेली सवलत रद्द करण्याची सूचना एका पत्राद्वारे एसपीजी प्रमुखांना केली होती. रिजीजू यांना प्रियंका गांधी यांनी एसपीजी प्रमुखांना लिहिलेल्या पत्राविषयी विचारणा करण्यात आली होती. त्यावर ते म्हणाले, याविषयीचा निर्णय सुरक्षा संस्थांवर सोपवणेच योग्य आहे.
एसपीजी प्रमुख दुर्गा प्रसाद यांना पाठवलेल्या पत्रात प्रियंका गांधी यांनी प्रसिद्धी माध्यमातील वृत्तांचा संदर्भ दिला होता, त्यात विमानतळावरील सुरक्षा तपासातून सवलत देण्यात आलेल्या व्हीव्हीआयपीच्या यादीतून रॉबर्ट वाड्रा यांचे नाव वगळण्याची शक्यता असल्याचे म्हटले होते. प्रियंकाने असे लवकरात लवकर झाल्यास चांगलेच आहे, असे म्हटले होते. (वृत्तसंस्था)