शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानकडून जैश ए मोहम्मदच्या मदरशांना लष्करी सुरक्षा, मदरशातील मुलाने सांगितली 'अनटोल्ड स्टोरी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 10:27 IST

भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले,

नवी दिल्ली - पुलवामा हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून एअर स्ट्राईक केला. त्यानंतर, या एअर स्ट्राईकवरुन देशात चांगलंच राजकारण सुरू झालं. तर अनेकांनी या एअर स्ट्राईकमध्ये किती दहशतवादी मारले गेले किंवा, एअर स्ट्राईक झाला की नाही, असेही प्रश्न उपस्थित केले. मात्र, भारताने केलेल्या एअर स्ट्राईकनंतर काही तासांतच बालकोट येथील जैश ए मोहम्मदच्या मदरशांतून तेथील मुलांना पाकिस्तानी लष्कराने सुरक्षित स्थळी हलवल्याची माहिती समोर आली आहे. 

भारतीय हवाई दलानं नियंत्रण रेषा ओलांडून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी तळांवर हल्ले केले, त्यावेळी त्या भागात 300 मोबाईल अ‍ॅक्टिव्ह होते, अशी आकडेवारी समोर आली होती. विशेष म्हणजे हे फोन अ‍ॅक्टिव्ह असल्याची माहिती भारतीय गुप्तचर विभागाच्या तांत्रिक विभागाला मिळाली होती. एअर स्ट्राइकमध्ये नेमके किती दहशतवादी मारले गेले, याची चर्चा सुरू असताना ही आकडेवारी पुढे आली. त्यानंतर, आता भारतीय वायू सेनेनं लक्ष्य केलेल्या तळांवर असलेल्या मदरशातील मुलांना हल्ल्यानंतर काही तासांतच सुरक्षित स्थळी हलविण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे. बालाकोट येथील तलिम-उल-कुराण या जैश ए मोहम्मदच्या मदरशांतील काही मुलांना लगेचच सुरक्षित स्थळी हलविण्यात आले. त्यानंतर, काही दिवसांनी त्यांना त्यांच्या घरी ठेवण्यात आल्याची माहिती, या मुलांच्या नातेवाईंकांनी दिली आहे. 

भारतीय वायू सेनेने 26 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पाकिस्तानच्या बालाकोट येथील दहशतवादी तळांवर हल्ला केला. भारतीय वायू सेनेनं हा हल्ल्या करण्यापूर्वीच एक आठवडाअगोदर या मदरशांना पाकिस्तानी सैन्यानं सुरक्षा दिली होती, असे येथील लहान मुलाने सांगितले. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर लगेचच पाकिस्तानकडून या मदरशांना संरक्षण पुरविण्यात आल्याचे आता उघड झाले आहे. 26 फेब्रवारी रोजी मध्यरात्री मोठा आवाज झाला. या आवाजाने आम्ही झोपेतून जागे झालो. हा हल्ला आमच्या मदरशापासून जवळच झाला होता. त्यानंतर, सकाळीच पाकिस्तानी सैन्याने आम्हाला एकत्र घेऊन एका सुरक्षित स्थळी नेले आणि काही दिवसांनी आमच्या घरी नेऊन साडले, असेही या चिमुकल्याच्या नातेवाईकांनी सांगितले आहे.   

टॅग्स :Jaish e Mohammadजैश-ए-मोहम्मदPakistanपाकिस्तानIndian Air Strikeएअर सर्जिकल स्ट्राईकStudentविद्यार्थी