जय जवान! घातपाताचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2019 10:53 IST2019-01-26T09:16:26+5:302019-01-26T10:53:34+5:30
श्रीनगरमधील खोनमोह येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

जय जवान! घातपाताचा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा
श्रीनगर - प्रजासत्ताक दिनी जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय लष्कराला मोठे यश मिळाले आहे. श्रीनगरमधील खोनमोह येथे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. मिळालेल्या माहितीनुसार, आताही जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. दरम्यान, शुक्रवारी (25 जानेवारी) दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अनंतनाग आणि पुलवामा जिल्ह्यात जवानांवर ग्रेनेड हल्ला केला.
खोनमोह येथे दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरात शोधमोहीम राबवली. यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार करण्यास सुरूवात केली. यानंतर उडालेल्या चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
#Visuals: Encounter underway between terrorists and security forces in Khonmoh, Srinagar (Visuals deferred by unspecified time) pic.twitter.com/gxLased8PF
— ANI (@ANI) January 26, 2019
#UPDATE: Security forces neutralise two terrorists during encounter in Khonmoh, Srinagar https://t.co/yeDnv8ROR1
— ANI (@ANI) January 26, 2019