Security forces on high alert along LoC as 500 terrorists waiting to sneak into Kashmir: Sources | LoCजवळ 500 दहशतवादी सक्रीय, सुरक्षा दलाला हायअलर्ट

LoCजवळ 500 दहशतवादी सक्रीय, सुरक्षा दलाला हायअलर्ट

नवी दिल्ली : केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान सैरभैर झाला आहे. त्यामुळे पाकिस्तान जम्मू-काश्मीर खोऱ्यात शांतता भंग करण्याच्या प्रयत्नात आहे. 

एलओसीजवळ जम्मू-काश्मीरमध्ये जवळपास 450-500 दहशतवादी घुसखोरी करण्यासाठी लाँच पॅड सुरू करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर देण्यासाठी भारतीय सुरक्षा दलाला पूर्णपणे स्वातंत्र्य देण्यात आले आहे, अशी माहिती लष्कराच्या सुत्रांनी दिली आहे. 

दरम्यान, चेन्नईमधील एका कार्यक्रमात लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी सांगितले की, भारताने एअरस्ट्राइक करत बालाकोटमध्ये दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त केले होते. मात्र मागील 8 महिन्यांपासून त्या जागेवर पुन्हा दहशतवादी कारवाया सुरु झाल्याचं दिसून येत आहे. बालाकोटमधील जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवादी कॅम्पला भारतीय हवाई दलाने नष्ट केले होते. 

लष्कर प्रमुख बिपीन रावत यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला होता की, भारतीय सैन्य पुन्हा एकदा एअरस्ट्राईक करणार का? यावर ते म्हणाले की, आम्ही एअर स्ट्राइक पुन्हा का करणार? यापुढेही जाऊ शकत नाही का? असे सांगत एकप्रकारे लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला इशारा दिला आहे. भारतीय लष्कर सीमेवर पूर्णपणे सज्ज आहे. नियंत्रण रेषेवर जवान तैनात आहेत असे त्यांनी म्हटले. 

तसेच, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कायम आहे. भारताच्या उत्तर आणि पश्चिमी सीमेवर तणाव कायम आहे. आमच्या शेजारील राष्ट्रासोबत संबंध ताणले गेले आहेत असं सांगून पाकिस्तान आणि चीन यांच्यावर लष्कर प्रमुख बिपीन रावत यांनी निशाणा साधला आहे. युद्धात कोणीही उपविजेता नसतो. फक्त जिंकणे महत्वाचे असते. भविष्यात सायबर युद्ध होईल. त्यासाठी आपल्याला आवश्यक तयारी करणे गरजेचे आहे असेही रावत यांनी सांगितले. 
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Security forces on high alert along LoC as 500 terrorists waiting to sneak into Kashmir: Sources

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.