शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
3
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
4
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
5
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
6
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
7
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
8
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
9
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
10
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
11
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
12
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
13
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
14
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
15
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
16
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
17
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
18
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
19
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा

आसाम नागरिकत्वाचे ‘कलम ६-अ’ वैधच; १९७१ पर्यंत आलेल्यांना नागरिकत्व - सर्वोच्च न्यायालय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2024 09:28 IST

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रश्नावर ‘आसाम करार’ हाच खरा राजकीय तोडगा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ४-१ अशा बहुमताने हा निकाल देण्यात आला.

नवी दिल्ली : आसाममधील अवैध नागरिकांच्या संवेदनशील मुद्द्यावर तोडगा म्हणून करण्यात आलेली नागरिकत्व कायद्यातील दुरुस्ती सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवली आहे. यानुसार, या कायद्यात जोडण्यात आलेले कलम ६-अ वैध ठरले असून, या माध्यमातून १ जानेवारी १९६६ ते २५ मार्च १९७१ या काळात आसाममध्ये आलेल्या प्रवासी नागरिकांना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यात येणार आहे. 

सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखालील पाच सदस्यीय खंडपीठाने हा निकाल दिला. या प्रश्नावर ‘आसाम करार’ हाच खरा राजकीय तोडगा असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले. ४-१ अशा बहुमताने हा निकाल देण्यात आला.राजीव गांधी-महंत यांच्यात झाला होता करारतत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी आणि ऑल आसाम स्टुडंटस् युनियनचे नेते प्रफुल्लकुमार महंत यांच्यात हा करार झाला होता. या करारानुसार नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करण्यात आली होती.

हिंसक आंदोलनाचा असा आहे इतिहासnआसाममध्ये बांगलादेशातून अवैधरीत्या आलेल्या नागरिकांमुळे स्थानिकांचे हक्क हिरावले जात असल्याच्या भावनेतून आसाममध्ये एएएसयू, अखिल भारतीय आसाम गण परिषद आणि इतर सहकारी संघटनांनी आंदोलन छेडले होते. n१९७९ मध्ये सुरू झालेल्या या आंदोलनाने नंतर हिंसक रूप घेतले. १९८५ मध्ये करारानंतर गण परिषदेचे प्रफुल्लकुमार महंत यांनी दोन वेळा विधानसभा निवडणूक जिंकून मुख्यमंत्रिपद भूषवले.

काय आहे नागरिकत्व कायदा कलम ६-अ?१९७९ मध्ये आसाममधून अवैध प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी आसाम स्टुडंट युनियनने आंदाेलन सुरू केले. १९८५ मध्ये यावर करार झाला. त्यानुसार भारतीय नागरिकत्व कायद्यात दुरुस्ती करून कलम ६-अ जोडण्यात आले. यात १ जानेवारी १९६६ ते २४ मार्च १९७१ दरम्यान आसाममध्ये आलेल्या नागरिकांना भारतीय नागरिकत्व मागण्याचा अधिकार देण्यात आला. यासाठी किमान १० वर्षे राज्यात वास्तव्य केल्यानंतर नोंदणी करण्याची अट होती. १९७१ नंतर आलेल्यांची ओळख पटवून त्यांना कायदेशीररीत्या परत पाठवले जाईल.

काँग्रेसचे उपनेते गोगोईंकडून स्वागतलोकसभेतील काँग्रेसचे उपनेते गौरव गोगोई यांनी या निकालाचे स्वागत करून स्व. राजीव गांधी यांच्या प्रयत्नांतून राज्यांत शांतता प्रस्थापित झाल्याचे ते म्हणाले. दुसरीकडे त्या काळात भाजप आंदोलनकर्त्यांना ‘देशद्रोही’ संबोधित होता, अशी टीका त्यांनी केली. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयAssamआसाम