शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर अब्दुल्ला पिता-पुत्रांची होणार सुटका?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 3:33 AM

अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारसोबत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटींचा नॅशनल कॉन्फरन्सने इन्कार केला आहे.

श्रीनगर : जम्मू-काश्मिरातील नॅशनल कॉन्फरन्सचे चेअरमन फारुक अब्दुल्ला आणि त्यांचे पुत्र, जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांची स्थानबद्धतेतून सुटका करण्यासाठी सरकारने एका गोपनीय योजनेवर काम सुरू केल्याचे वृत्त आहे. काही काळ सक्रिय राजकारणातून दूर होण्याच्या अटीवर त्यांची सुटका केली जाऊ शकते, असे उच्चस्तरीय सूत्रांनी सांगितले.

उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यासंबंधीचा प्रस्ताव तयार केला जात असून अब्दुल्ला पिता-पुत्राशी संपर्क केला जाऊ शकतो. अब्दुल्ला पिता-पुत्रांनी काही काळ भारत सोडून लंडनमध्ये राहायला जावे, असा एक पर्याय त्यात आहे. लंडनमधून आपल्या एजंटांमार्फत ते जम्मू-काश्मिरातील आपला पक्ष चालवू शकतील. गेल्या वर्षी ५ आॅगस्ट रोजी जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे ३७० वे कलम रद्द केल्यानंतर सरकारने अब्दुल्ला पिता-पुत्रांस स्थानबद्ध केले होते. तेव्हापासून ते स्थानबद्धतेतच आहेत. काश्मिरातील २६ लोकांची जम्मू-काश्मीर सरकारने स्थानबद्धतेतून शुक्रवारी सुटका केली. निशत येथील ज्येष्ठ वकील नजीर अहमद रोंगा यांचा त्यात समावेश आहे. काश्मीर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष असलेले रोंगा हे फुटीरवादी हुरियत नेते मिरवैज उमर फारुक यांचे निकटचे सहकारी आहेत.

नॅशनल कॉन्फरन्सकडून इन्कारअब्दुल्ला पिता-पुत्रांच्या सुटकेसाठी केंद्र सरकारसोबत कोणत्याही प्रकारच्या वाटाघाटींचा नॅशनल कॉन्फरन्सने इन्कार केला आहे. राजकीय नेत्यांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणीही पक्षाने केली आहे. पक्षाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अब्दुल्ला पिता-पुत्रांच्या सुटकेसाठी वाटाघाटी सुरू असल्याचे वृत्त निराधार आहे. असा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, तसेच असा प्रस्ताव आमच्या नेत्यांकडून स्वीकारला जाऊ शकतही नाही. आमच्या नेत्यांनी विजनवासात जाण्याचा प्रश्नच निर्माण होत नाही.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरOmar Abdullahउमर अब्दुल्लाFarooq Abdullahफारुख अब्दुल्लाArticle 370कलम 370