‘सीरम’ची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी आजपासून; १६०० नागरिक सहभागी होणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2020 08:34 IST2020-08-25T03:03:27+5:302020-08-25T08:34:34+5:30
एम्स दिल्ली, बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे, राजेंद्र मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, पाटणा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील १६०० नागरिक या चाचणीत सहभागी होणार आहेत.

‘सीरम’ची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी आजपासून; १६०० नागरिक सहभागी होणार
नवी दिल्ली : आॅक्सफर्डच्या कोविड - १९ लसीच्या दुसºया टप्प्यातील मानवी चाचणीला पुणे येथील सीरम इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया मंगळवारपासून सुरुवात करणार आहे. ‘कोविशिल्ड’ची सुरक्षा आणि रोगप्रतिकारकशक्तीबाबतची निश्चिती यातून करण्यात येणार आहे.
ब्रिटीश- स्वीडन फार्मा कंपनी अॅस्ट्राझिनेकासोबत सीरम इन्स्टिट्यूटने भागीदारी केली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचे अतिरिक्त संचालक प्रकाशकुमार सिंह यांनी सांगितले की, आम्हाला केंद्रीय औषधी मानक नियंत्रण संघटनेकडून सर्व मंजुरी मिळाली आहे. २५ आॅगस्टपासून भारती विद्यापीठ मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल येथे मानवी चाचणी सुरु करत आहोत.
केंद्र सरकारने सीरम इन्स्टिट्यूटला आॅक्सफर्डच्या लसीच्या दुसºया आणि तिसºया टप्प्यातील चाचण्या करण्यास ३ आॅगस्ट रोजी परवानगी दिली होती. या चाचण्या १७ निवडक ठिकाणी करण्यात येत आहेत. यात एम्स दिल्ली, बी. जे. मेडिकल कॉलेज पुणे, राजेंद्र
मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, पाटणा यासह अन्य ठिकाणांचा समावेश आहे. १८ वर्षांवरील १६०० नागरिक या चाचणीत सहभागी होणार आहेत. ब्रिटनमध्ये पाच ठिकाणी या लसीची दोन टप्प्यातील चाचणी पूर्ण झाली आहे आणि ती पूर्णपणे सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे. यामुळे अँटीबॉडीज तयार झाल्याचेही दिसून आले आहे.