शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
2
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
5
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
6
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
7
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
8
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट
9
Mahindra & Mahindra च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; एक्सपर्ट म्हणाले, "₹२९०० पर्यंत..."
10
बाहुबलीच्या आयुष्यात होणार देवसेनाची एन्ट्री?; प्रभासची क्रिप्टिक पोस्ट चर्चेत
11
३.५ किलो वजन, १२०० रुपये किंमत, या दुर्मीळ आंब्याची उरलीत केवळ १० झाडं, मध्य प्रदेश सरकार चिंतीत 
12
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
13
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
14
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
15
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
16
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
17
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
18
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
19
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
20
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत

वैद्यकीय शिक्षण क्षेत्रातील पदव्युत्तर शिक्षणासाठी जागा वाढवाव्यात- डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2019 3:20 PM

इंडियन मेडिकल काऊंसिल संशोधन विधेयक २०१९ मंजूर करण्यासाठी आज लोकसभेत मांडण्यात आले.

नवी दिल्लीः इंडियन मेडिकल काऊंसिल संशोधन विधेयक २०१९ मंजूर करण्यासाठी आज लोकसभेत मांडण्यात आले. या विधेयकावरील चर्चेमध्ये खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सहभाग घेत सदर विधेयक हे देशातील आयुर्विज्ञान क्षेत्रासाठी अतिशय महत्वाचे असून या विधेयकाद्वारे वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अधिक पारदर्शकता, त्याबाबत नैतिक जबाबदारी आणि गुणवत्ता वाढीसाठी अत्यंत महत्वपूर्ण असल्याचे मतं खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी चर्चेदरम्यान व्यक्त केले.यावेळी देशभरात डॉक्टरांवर हल्ले होण्याच्या घटना वाढत असल्याचे पुन्हा एकदा निदर्शनास आणत देशभरात आतापर्यंत एक हजारहून अधिक अशा घटना झाल्या असून ७५% घटनांमध्ये डॉक्टर बळी पडले असल्याचे सांगितले. केंद्र सरकारने अश्या घटना रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, अशी मागणी करत असा कायदा व्हावा यासाठी यापूर्वी १६ व्या लोकसभेत प्रायवेट मेंबर बिल मांडले होते, याची आठवण करून देत लवकरात लवकर केंद्र सरकारने डॉक्टरांवरील हल्ल्याच्या घटना रोखण्यासाठी कठोर केंद्रीय कायदा करावा, अशी पुन्हा एकदा मागणी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी मा. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्याकडे केली केली.देशातील वैद्यकीय क्षेत्रातील पायाभूत सुविधांसाठी होणारी गुंतवणूक ही १.४ टक्के इतकीच असून इतर अनेक देशांच्या तुलनेने फार कमी आहे. देशात डॉक्टर आणि रुग्ण यांचे प्रमाण खूपच कमी असून देशभरामध्ये ७लाख ५० हजार डॉक्टरांची कमतरता आहे. देशातील डॉक्टरांची संख्या वाढावी याकरिता वैद्यकीय क्षेत्रातील गुंतवणूकीत वाढ करुन पायाभूत सुविधां वाढविणे गरजेचे असल्याचे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी मांडले. आपल्या देशात एकूण ३३१ वैद्यकीय महाविद्यालये असून दरवर्षी ६३ हजार डॉक्टर्स पदवीपर्यंतचे वैद्यकीय शिक्षण पूर्ण करतात परंतु फक्त २३ हजार ७२९ पदव्युत्तर शिक्षणासाठी जागा उपलब्ध आहेत. ही चिंतेची बाब असून पदव्युत्तर शिक्षणासाठी जागा वाढवण्यात याव्यात अशी सुचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यादरम्यान केली. तसेच केंद्र सरकार देशभरात १लाख ५० हजार आरोग्य केंद्र उपलब्ध करणार असून पुढील पदव्युत्तर शिक्षणाची संधी उपलब्ध न झालेल्या डॉक्टर्सना या आरोग्य केंद्रामध्ये कायमस्वरुपी नोकरी उपलब्ध करुन दिल्यास बेरोजगार डॉक्टरांना रोजगार मिळू शकेल आणि ग्रामिण भागांमध्ये सुद्धा यामुळे डॉक्टर उपलब्ध होतील, अशी आशा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वक्त केली. त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात पी.पी.पी तत्वावर गुंतवणूक आणल्यास सरकारचा निधी न वापरता या क्षेत्रातील पायाभूत सुविधा वाढण्यास प्रोत्साहन मिळेल, असे सांगितले.डॉक्टरांची संख्या वाढावी याकरिता सरकार ब्रिज कोर्स सुरु न करता आयुर्वेद, होमिओपॅथी आणि युनानी या पॅथींना चालना दिल्यास या पॅथींतील डॉक्टरांची संख्या वाढेल, असे नमुद करत यामुळे सदर पॅथींच्या वाढीस हातभार लागेल, असे मत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी वक्त केले. मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाच्या कार्यवाहीबाबत अनेक वेळा टिका झाल्या असून गेल्या काही वर्षांमध्ये वैद्यकीय शिक्षण क्षेत्राचा दर्जा खालवणे, शिक्षण क्षेत्रातील गैरव्यवहारांवर अंकुश आणण्यासाठी अपयशी ठरणे असे अनेक आरोप करण्यात आले आहेत, असे सांगत खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाला पर्याय असणे अतिशय गरजेचे असल्याचे सांगत शासी बोर्ड प्रस्थापित करुन त्याला मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाचे अधिकार प्राप्त करण्यात यावेत जेणेकरुन भविष्यात शासी बोर्ड मेडिकल काऊंसिल ऑफ इंडियाचे काम करु शकेल तसेच बोर्डावरील सदस्यांची संख्या ७ वरुन १२ करण्यात यावीत, अश्या सुचना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी यावेळी मांडल्या.