शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आप-कांग्रेसमध्ये जागावाटप ठरले? असा असेल दिल्ली, पंजाब आणि गुजरातमध्ये फॉर्म्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2024 20:04 IST

Seat Sharing Formula: दोन दिवसांपूर्वीच AAP प्रमुख अरविंद केजरीवाल आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्यात बैठक झाली होती.

AAP-Congress Seat Sharing Formula: आगामी लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा सामना करण्यासाठी इंडिया आघाडीतील जागावाटपाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. इंडिया आघाडीतील सर्वात मोठा पक्ष असलेला काँग्रेस वेगवेगळ्या पक्षांसोबत बैठका घेत आहे. दरम्यान, काँग्रेसची आम आदमी पक्षासोबत (आप) दोनदा बैठक झाली. या दोन्ही बैठकीनंतर काँग्रेस आणि आपमध्ये जागावाटपाबाबत निर्णय झाल्याची माहिती मिळत आहे.

अद्याप अधिकृत घोषणा नाही मीडिया रिपोर्ट्सनुसार, कोणत्या राज्यात किती जागा लढवायचा, हे दोन्ही पक्षांमध्ये जवळपास निश्चित झाले आहे. आम आदमी पार्टीचे संयोजक अरविंद केजरीवाल आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यात नुकत्याच झालेल्या बैठकीत या सर्व गोष्टींचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अद्याप दोन्ही पक्षाकडून अधिकृत विधान समोर आले नाही. 

असा असू शकतो सीट शेअरिंगचा फॉर्म्युला दिल्लीत आप 4 तर काँग्रेस 3 जागांवर निवडणूक लढवू शकते. पंजाबबाबत दोन्ही पक्षांनी स्पष्ट केले आहे की, दोघेही स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार आहेत, मात्र निवडणुकीपूर्वी अकाली दल आणि भाजप पुन्हा एकत्र आल्यास आप आणि काँग्रेस स्वतंत्रपणे चर्चा करतील. गुजरातमध्ये काँग्रेस 'आप'ला फक्त 2 जागा देऊ शकते. 'आप'ने 2 हून अधिक जागा मागितल्या आहेत. 

हरियाणामध्येही 'आप'ने 2 ते 3 जागांवर निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे, मात्र इथेही काँग्रेस आम आदमी पार्टीला 1 पेक्षा जास्त जागा देण्यास तयार नाही. गोव्यात काँग्रेस सध्या 'आप'ला एकही जागा देण्यास तयार नाही. त्याचे कारण म्हणजे गोव्यात लोकसभेच्या फक्त 2 जागा आहेत आणि काँग्रेसला दोन्हीवर निवडणूक लढवायची आहे. 

टॅग्स :lok sabhaलोकसभाElectionनिवडणूकAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपा