चमोलीमध्ये बर्फाखाली अडकलेल्या २५ कामगारांचा शोध सुरू, लष्कराचे बचाव कार्य पुन्हा सुरू; ३३ जणांना वाचवण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 08:45 IST2025-03-01T08:37:02+5:302025-03-01T08:45:57+5:30

उत्तराखंडमधील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, पिथोरागड आणि बागेश्वर येथे हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Search underway for 25 workers trapped under snow in Chamoli, Army rescue operation resumes 33 people rescued | चमोलीमध्ये बर्फाखाली अडकलेल्या २५ कामगारांचा शोध सुरू, लष्कराचे बचाव कार्य पुन्हा सुरू; ३३ जणांना वाचवण्यात यश

चमोलीमध्ये बर्फाखाली अडकलेल्या २५ कामगारांचा शोध सुरू, लष्कराचे बचाव कार्य पुन्हा सुरू; ३३ जणांना वाचवण्यात यश

उत्तराखंडच्या पर्वतीय भागात सतत बर्फवृष्टी होत असल्याने कर्फ्यूसारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. बर्फवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. रस्त्यांवर अनेक किलोमीटरपर्यंत बर्फ पसरलेला आहे. त्यामुळे सार्वजनिक जीवन विस्कळीत झाले आहे. आजही उत्तराखंडमधील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे. यानंतर, ३ आणि ४ मार्च रोजीही हवामान खराब राहण्याची शक्यता आहे.

शनिवारी देहरादून, उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, टिहरी, पौरी, चमोली, पिथोरागड, बागेश्वर, अल्मोडा, नैनिताल आणि चंपावत येथे पावसाची शक्यता आहे. २५०० मीटर आणि त्याहून अधिक उंची असलेल्या ठिकाणी हलक्या ते मध्यम हिमवृष्टीची शक्यता आहे. हिमस्खलनाचा इशाराही देण्यात आला आहे.

Pune Crime News : "दोघांमध्ये पैशाचा वाद, दोघांच्या संमतीने...", स्वारगेट प्रकरणातील आरोपी गाडेच्या वकिलांचा मोठा दावा

उत्तराखंडमधील उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, पिथोरागड आणि बागेश्वर येथे हिमस्खलनाचा इशारा देण्यात आला आहे. यामध्ये चमोली जिल्ह्यात सर्वात जास्त धोका आहे. शुक्रवारी उत्तराखंडमधील माना येथे हिमनदी तुटल्यामुळे मोठे हिमस्खलन झाला. यामुळे बीआरओ कॅम्पचे नुकसान झाले आहे.

येथे सुमारे ५७ कामगार उपस्थित असल्याचे सांगण्यात आले. हिमस्खलनामुळे अनेक मार्ग बंद झाले आहेत. अनेक ठिकाणी नुकसानही झाले आहे. सीमावर्ती जिल्ह्यात पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे गंगोत्री महामार्गावरील गंगाणीच्या पलीकडे वाहतूक ठप्प झाली आहे. गंगणी आणि गंगोत्री दरम्यानच्या महामार्गावर डबराणी येथे हिमस्खलन झाले आहे.

सध्या चमोलीत हवामान स्वच्छ झाले आहे. पाऊस आणि बर्फवृष्टी थांबली आहे. सकाळी पुन्हा बचावकार्य सुरू करण्यात आले आहे. बद्रीनाथ धाम येथे उपस्थित असलेले सैन्य आणि आयटीबीपी बेपत्ता कामगारांचा शोध घेत आहेत. आतापर्यंत बर्फाखाली अडकलेल्या ३२ जणांना सुरक्षितपणे वाचवण्यात आले आहे. त्यांच्यावर माना येथील आयटीबीपी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. २५ जण अजूनही बेपत्ता आहेत.

गोपेश्वरमधील ४० हून अधिक गावे बर्फाच्छादित झाली आहेत. हिमवृष्टीमुळे औली, बद्रीनाथ, जोशीमठ मलारी आणि गोपेश्वर चोपटा महामार्ग बंद आहेत. बर्फवृष्टी आणि पावसामुळे थंडीही वाढली आहे. चमोली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून श्री बद्रीनाथ, हेमकुंड साहिब, औली, ज्योतिर्मठ यासह ४० हून अधिक गावांमध्ये सतत बर्फवृष्टी होत आहे आणि सखल भागात पाऊस पडत आहे.

Web Title: Search underway for 25 workers trapped under snow in Chamoli, Army rescue operation resumes 33 people rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.