काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 12:32 IST2025-05-02T12:31:42+5:302025-05-02T12:32:18+5:30

पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी नैसर्गिक गुंफा किंवा इथल्या जंगलात मागील १० दिवसांपासून लपले आहेत

Search operation continues in Kashmir, 3000 people arrested so far; Pahalgam attack terrorists hiding in the forest | काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी

काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी

श्रीनगर - जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पूर्ण काश्मीरात पोलीस आणि लष्कराकडून सर्च ऑपरेशन सुरू आहे. आतापर्यंत ७५ ओवर ग्राऊंड वर्कर्सना अटक करण्यात आली असून चौकशीसाठी ३ हजाराहून अधिक लोकांना एनआयए आणि पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सर्वांची कसून चौकशी होत आहे. अटक केलेल्यांमध्ये बहुतांश दक्षिण काश्मीरातील लोक आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यात स्थानिकांनी मदत केल्याचा सुरक्षा दलाला संशय आहे.

NIA सूत्रांच्या हवाल्यानुसार, २० हून अधिक ओवर ग्राऊंड वर्कर्सला पकडले आहे. त्यांची चौकशी सुरू आहे. तपास यंत्रणा भलवाल जेलमध्ये बंद २ जणांची चौकशी करण्याची तयारी करत आहे. लश्करचे २ ओवर ग्राऊंड वर्कर्स निसार अहमद हाजी आणि मुस्ताक हुसैन यांना प्रश्न विचारले जाणार आहेत. हे दोघेही लश्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत करायचे. २०२३ साली भाटा धुरिया आणि तोतागली येथे सुरक्षा जवानांच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यावेळी या दोघांनी दहशतवाद्यांची मदत केल्याच्या आरोपात ते अटकेत आहेत. 

तपास यंत्रणांना शंका आहे की, राजौरी, पुंछमध्ये सैन्यावर हल्ला आणि पहलगामच्या बैसरन खोऱ्यात हल्ला करणारे दहशतवादी एकमेकांशी संपर्कात होते अथवा POK च्या एकाच लश्कर ए कॅम्पमधून ते आले होते. त्यामुळे जेलमध्ये बंद असलेले ओवर ग्राऊंड वर्करला चौकशी करण्यासाठी एनआयए ताब्यात घेऊ शकते. 

दहशतवादी जंगलात लपलेत...

दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादी नैसर्गिक गुंफा किंवा इथल्या जंगलात मागील १० दिवसांपासून लपले आहेत. सुरक्षा यंत्रणा या संपूर्ण परिसराचा कसून तपास करत आहे. सुरक्षा दल बैसरन खोरे, त्यानंतर तारनू हपतगुंड, डावरू आणि त्या आसपासच्या घनदाट जंगलात शोध मोहीम करत आहे. पहलगाम, बैसरन खोरे आणि त्याच्या आसपासच्या २० किमी परिसरातील २० एप्रिलपासून विविध मोबाईल फोन लोकेशन, कॉल डिटेल्स गोळी करण्याचं काम तपास यंत्रणा करत आहे.

Web Title: Search operation continues in Kashmir, 3000 people arrested so far; Pahalgam attack terrorists hiding in the forest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.