दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच वकील आणि पोलिस भिडले; जाळपोळ, गोळीबार 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 04:59 PM2019-11-02T16:59:34+5:302019-11-02T17:00:40+5:30

 दिल्लीतील तीस हजारी कोर्टाच्या परिसरातच पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली आहे.

scuffle has broken out between Delhi Police | दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच वकील आणि पोलिस भिडले; जाळपोळ, गोळीबार 

दिल्लीत न्यायालयाच्या आवारातच वकील आणि पोलिस भिडले; जाळपोळ, गोळीबार 

googlenewsNext

नवी दिल्ली -  दिल्लीतील तीस हजारी कोर्टाच्या परिसरातच पोलीस आणि वकिलांमध्ये हाणामारी झाली आहे. पार्किंगवरून झालेल्या वादाचे पर्यावसान हाणामारीत झाले असून, यादरम्यान पोलिसांच्या गाड्यांचीही जाळपोळ करण्यात आली. तसेच गोळीबार झाल्याचेही सांगण्यात येत आहे. या प्रकारामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली. पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या हाणामारीत एक वकील जखमी झाला असून, त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 



 पोलीस आणि वकिलांमध्ये झालेल्या या वादानंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. काही पोलिस अधिकाऱ्यांवरसुद्धा हल्ला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान गोळीबारानंतर दोन्ही बाजूंनी परिस्थिती चिघळली. तसेच गोंधळाच्या वातावरणात कैंद्यांची ने आण करणारे एक वाहनही पेटवून देण्यात आले. गाग शमवण्यासाठी अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली आहे. तसेच अतिरिक्त पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे. 



 दरम्यान, दोन्ही पक्षांना शांत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. संतापलेल्या वकिलांनी कोर्टाच्या गेटला टाळे ठोकले आहे. तसेच कुणालाही आत येऊ दिले जात नाही आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा परिसरात दाखल झाला आहे. तर दुसरीकडे वकिलांकडून जोरदार घोषणाबाजी सुरू आहे. 

Web Title: scuffle has broken out between Delhi Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.