रॉबर्ट वद्रांच्या फेसबुक पोस्टवरून लोकसभेत गदारोळ
By Admin | Updated: July 23, 2015 14:39 IST2015-07-23T14:39:42+5:302015-07-23T14:39:42+5:30
रॉबर्ट वद्रा यांनी तथाकथित नेत्यांकडून भारत चालवला जात असल्याबद्दल खेद वाटत असल्याचं आणि भारताची जनता मूर्ख नसल्याचं म्हटलं आहे.

रॉबर्ट वद्रांच्या फेसबुक पोस्टवरून लोकसभेत गदारोळ
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - राज्यसभेमध्ये काँग्रेसने स्वराज यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून गदारोळ केलेला असताना भाजपाच्या खासदारांनी रॉबर्ट वद्रा यांच्या फेसबुक पोस्टवरून धुमाकूळ घातला. वद्रा यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर संसदेचं अधिवेशन सुरू झालं आणि मुद्याला बगल देण्यासाठी त्यांच्या चिल्लर क्लृप्त्या सुरू झाल्याची टिप्पणी केली. तसेच अशा तथाकथित नेत्यांकडून भारत चालवला जात असल्याबद्दल खेद वाटत असल्याचं आणि भारताची जनता मूर्ख नसल्याचं म्हटलं आहे.
भाजपाच्या खासदारांनी वद्रा यांचं वक्तव्य संसदेचा अपमान करणारं असल्याचं म्हणत वद्रा यांना संसदेसमोर बोलावलं पाहिजे त्यांची चौकशी केली पाहिजे आणि त्यांना योग्य ती शिक्षा दिली गेली पाहिजे असं म्हटलं आहे.
काँग्रेसचे नेते वीरप्पा मोईली यांनी भाजपाच्या आरोपांकडे दुर्लक्ष करताना मुख्य मुद्यांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.