धूमकेतूवर यान उतरविण्यासाठी शास्त्रज्ञ सज्ज
By Admin | Updated: November 13, 2014 02:02 IST2014-11-13T02:02:48+5:302014-11-13T02:02:48+5:30
धूमकेतूवर यान उतरविण्यात ऐनवेळी अडचण येऊनही युरोपियन अवकाश संस्थेचे शास्त्रज्ञ आता सज्ज झाले आहेत.

धूमकेतूवर यान उतरविण्यासाठी शास्त्रज्ञ सज्ज
बर्लिन : धूमकेतूवर यान उतरविण्यात ऐनवेळी अडचण येऊनही युरोपियन अवकाश संस्थेचे शास्त्रज्ञ आता सज्ज झाले आहेत. 67 पी असे नाव (चुरुमाव - जिरासिमेंको ) असलेल्या 4 कि.मी.लांबीच्या धूमकेतूवर यान उतरविण्याची ही मोहीम गेली 1क् वर्षे चालू असून यान धूमकेतूवर उतरवणो ही या मोहिमेची इतिश्री असेल. धूमकेतूवर उतरणा:या यानाचे नाव रोसेटा असून, त्याबरोबर असणा:या शिडीचे नाव फिलाई आहे. 6.4 अब्ज कि.मी. अंतरावरच्या त्यांच्या या प्रवासाची ही अखेर असेल.
मंगळवारी संध्याकाळी यानाच्या उतरण्याच्या क्षमतेत अडचण निर्माण झाली. यान धूमकेतूवर उतरताना ते उंच उडू नये यासाठी बसविण्यात आलेली यंत्रणा कार्यक्षम नसल्याचे लक्षात आले. त्याऐवजी युरोपियन अवकाश संस्था आता बर्फात बसविता येणा:या स्क्रूचा वापर करणार आहे. यानाच्या वरच्या भागात बसविलेला गॅस थ्रस्टर कार्यान्वित होत नसल्याचे लक्षात आले, त्यामुळे आता स्क्रूवर अवलंबून राहावे लागत आहे असे व्यवस्थापक स्टीफन उलेमाक यांनी जर्मनीतील डीएलआर अवकाश केंद्रावरून बोलताना सांगितले. हे यान धूमकेतूच्या घसरत्या भागावर उतरू नये यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत, असे त्यांनी सांगितले.
धूमकेतू सूर्याकडे जात असताना रोसेटा यान व फिलाई त्याबरोबर असतील. उष्णता मिळू लागली की धूमकेत वितळू लागेल. त्यावेळी त्याची माहिती 21 उपकरणांच्या साहाय्याने घेतली जाणार आहे. त्यामुळे धूमकेतूच्या उत्पत्तीची माहिती मिळेल. (वृत्तसंस्था)
पृथ्वीपासून 5क्क् दशलक्ष कि.मी. अंतरावरील प्रयोग
4नियोजित कार्यक्रमानुसार सारे पार पडले तर रोसेटा यानाहून लँडर पहाटे 3.35 वाजता वेगळा होईल. यान धूमकेतूवर उतरेल व स्क्रूच्या साहाय्याने ते जखडले जाईल. यान धूमकेतूवर उतरत असताना शास्त्रज्ञांना ते पाहण्याखेरीज अन्य काहीही करता येणार नाही.
4पृथ्वीपासून हा धूमकेतू 5क्क् दशलक्ष कि.मी. एवढय़ा प्रचंड अंतरावर असल्याने उतरताना त्यास सूचना देणो शक्य नाही.
4जर यान यशस्वीपणो उतरले तर पृथ्वीवर सकाळी 11.3क् वाजता हे वृत्त कळेल.
4समजा रोसेटा यान धूमकेतूवर उतरू शकले नाही, तरीही 1.3 अब्ज युरो (1.62अब्ज डॉलर) ची ही मोहीम निष्फळ ठरणार नाही असे युरोपियन अवकाश संस्थेच्या शास्त्रज्ञांचे म्हणणो आहे. रोसेटा अयशस्वी ठरले तरीही 8क् टक्के कामे पूर्ण करेल असा विश्वास शास्त्रज्ञांना आहे.