शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

अमानुष! सामूहिक बलात्कारानंतर हॉस्पिटलमध्ये न नेल्याने मुलीचा मृत्यू, कुटुंबावरचा कलंक टाळण्यासाठी दिला मुलीचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2017 14:29 IST

पंजाबमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीवर 25 ऑक्टोबर रोजी सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती.

ठळक मुद्दे पंजाबमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीवर 25 ऑक्टोबर रोजी सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती.मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही तसंत तिच्या आई-वडिलांनी तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्येही नेलं नाही.

चंदीगड- पंजाबमध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या एका मुलीवर 25 ऑक्टोबर रोजी सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली होती. या मुलीचा फजिलका गावात रविवारी मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, मुलीवर बलात्कार झाल्यानंतर तिच्या कुटुंबियांनी या प्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली नाही तसंत तिच्या आई-वडिलांनी तिला उपचारासाठी हॉस्पिटलमध्येही नेलं नाही. मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याने समाजात नाव खराब होईल, या भीतीने त्यांनी पीडित मुलीवर घरीच उपचार केले. हॉस्पिटलमधून उपचार न मिळाल्याने अती रक्तस्त्राव होऊन, त्या पीडित मुलीचा मृत्यू झाला. 

पीडित मुलगी सरकारी शाळेत इयत्ता सातवीत शिकणारी होती. शाळेत जाण्याच्या रस्त्यावर तिला अडवून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. तिच्या कुटुंबियांनी त्यानंतर तिला घरी नेलं. मुलीला घरी नेऊन तेथेच तिच्यावर उपचार करण्यात आले. पीडित मुलीबरोबर घडलेली घटना गावातील एका व्यक्तीने पोलिसांना सांगितली. त्यानंतर पोलिसांनी मुलीच्या घरी धाव घेतली. पण तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता, असं जलालबादचे डीएसपी अमरजीत सिंग यांनी सांगितलं. 

मुलीवर बलात्कार झाल्याचं लोकांना समजल्यावर आपलं नाव खराब होईल, असं तिच्या कुटुंबीयांचं मत होतं. पीडित मुलीला तत्काळ उपचाराची गरज होती. पण त्यांनी तिला हॉस्पिटलमध्ये नेलं नाही, असंही सिंग यांनी सांगितली. दरम्यान, या प्रकरणातील तीन आरोपींपैकी एकालाही अजून अटक करण्यात आलेली नाही. 

पीडित मुलीच्या आईने एका आरोपीला ओळखल्याचं समजतं आहे. तो पीडित मुलीच्या शाळेतच शिकणारा असल्याचं समजतं आहे. पण आरोपी अल्पवयीन असल्याने त्याची ओळख सांगण्यात आलेली नाही. आरोपींचं वय नेमकं किती आहे हे समजलं नाही, पण तो आरोपी फरार आहे. इतर दोघांची अजून ओळख पटलेली नसून ते मुख्य आरोपीचे मित्र असण्याची शक्यता आहे, असंही पोलिसांनी सांगितलं. दरम्यान, पोलिसांनी तीन अज्ञातांविरोधात जलालबाद सदर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाPoliceपोलिसhospitalहॉस्पिटल