वर्तमानपत्रावर दिला मुलांना पोषण आहार; मुख्याध्यापक निलंबित
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 06:33 IST2025-11-09T06:32:14+5:302025-11-09T06:33:29+5:30
Madhya Pradesh News: भाज्यसशासित मध्य प्रदेशात काही मुले मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत वर्तमानपत्राच्या कागदावर जेवत असल्याचा एक व्हिडीओ शनिवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रसारित केल्यावर खळबळ माजली.

वर्तमानपत्रावर दिला मुलांना पोषण आहार; मुख्याध्यापक निलंबित
नवी दिल्ली : भाज्यसशासित मध्य प्रदेशात काही मुले मध्यान्ह भोजन योजनेंतर्गत वर्तमानपत्राच्या कागदावर जेवत असल्याचा एक व्हिडीओ शनिवारी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी एक्स या सोशल मीडियावर प्रसारित केल्यावर खळबळ माजली. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तो शिंदपूर जिल्ह्यातील विजापूर तालुक्यातील इल्हपूर गावातील असल्याचे निष्पन्न झाले. नंतर या घटनेची दखल शिंदेपूर जिल्हाधिकाऱ्यांनी त्वरित घेत शाळेचे मुख्याध्यापक भोगराम धवलखंड यांना निलंबित केले तसेच ज्या संस्थेकडे मध्यान्ह भोजनचे कंत्राट होते ते कंत्राटही रद्द केले. मुलांना वर्तमानपत्रावर बटाट्याचा रस्सा देण्यात आला होता.
हृदयाला वेदना झाल्या : राहुल गांधी
हा व्हिडिओ एक्स या माध्यमावर प्रसारित करताना राहुल गांधी यांनी 'देशांचे भविष्य असलेल्या या मुलांना वर्तमानपत्राच्या कागदावर जेवण देत असल्याचे पाहून हृदयाला प्रचंड वेदना झाल्या. या मुलांना ताटात अन्न देता येत नाही, हा त्यांच्या आत्मसन्मानाचा अपमान असल्याची टीका केली. मध्य प्रदेशात २० वर्षांपासून सत्ता आहे या पक्षाने मुलांची तोडफोडी केली, असा आरोप त्यांनी केला.