शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

School : स्कूल चले हम... हरयाणात 1 सप्टेंबरपासून 4 थी साठीही शाळेची घंटा वाजणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2021 21:10 IST

राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे.

ठळक मुद्देहरयाणात 1 सप्टेंबरपासून सर्वच सरकारी आणि खासगी शाळेंमध्ये इयत्ता 4 थी आणि 5 वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येत आहेत.

चंढीगड - देशात गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या शाळा आता सुरू होण्याच्या मार्गावर आहेत. हरयाणातील मनोहरलाल ठक्कर सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, राज्यातील 4 थी अन् 5 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येणार आहेत. यासंदर्भात हरयाणा सरकारच्या अधिकृत ट्विटर अकाऊँटवरुन माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोरोना नियम पाळून कॉलेज सुरू करण्यात आले आहेत. 

देशातील विविध राज्यांत आता शाळा सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील शाळा आणि कॉलेज सुरू करण्याबाबतचा निर्णय टास्क फोर्सचा अहवाल आल्यावर घेण्यात येईल असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी गेल्या आठवड्यात सांगितले होते. आता, हरयाणा सरकारने शाळा सुरू करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. हरयाणात 1 सप्टेंबरपासून सर्वच सरकारी आणि खासगी शाळेंमध्ये इयत्ता 4 थी आणि 5 वी पर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्यात येत आहेत. या विद्यार्थ्यांसाठी विभागाने जारी केलेल्या एसओपींचे अनुपालन करून तुकड्या लावण्यात येतील. आई-वडिलांच्या परवानगीनंतरच या मुलांना शाळांमध्ये प्रवेश मिळेल, असे ट्विट हरयाणा सरकारने केले आहे. 

अहवाल आल्यानंतर निर्णय - टोपे

राज्यात शाळा व महाविद्यालये सुरु करण्यासंदर्भात 5 ते 6 दिवसांमध्ये निर्णय घेण्यात येईल. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभाग कुलगुरुंच्या संपर्कात आहे. कुलगुरु त्यांच्या कार्यक्षेत्रातील महाविद्यालय सुरु करण्यासंदर्भातील अहवाल शिक्षण संचालक कार्यालयाकडे पाठवतील. साधारणपणे येत्या पाच ते सहा दिवसात निर्णय होईल. शालेय शिक्षण विभाग आणि टास्क फोर्स यांची चर्चा होऊन शाळा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल, अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली. 

टॅग्स :SchoolशाळाHaryanaहरयाणाChief Ministerमुख्यमंत्री