शालेय क्रिकेट, कबड्डी स्पर्धेत मनमानी

By Admin | Updated: September 3, 2015 23:05 IST2015-09-03T23:05:37+5:302015-09-03T23:05:37+5:30

श्रीरामपूर : जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित श्रीरामपूर तालुका क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा क्रीडाधिकार्‍यांच्या नियंत्रणाअभावी स्थानिक पातळीवर संयोजकांकडून मनमानी होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.

School cricket, kabaddi competition arbitrarily | शालेय क्रिकेट, कबड्डी स्पर्धेत मनमानी

शालेय क्रिकेट, कबड्डी स्पर्धेत मनमानी

रीरामपूर : जिल्हा क्रीडा परिषदेच्या वतीने आयोजित श्रीरामपूर तालुका क्रीडा स्पर्धांमध्ये जिल्हा क्रीडाधिकार्‍यांच्या नियंत्रणाअभावी स्थानिक पातळीवर संयोजकांकडून मनमानी होत असल्याच्या पालकांच्या तक्रारी आहेत.
अशोकनगरच्या जानकीबाई आदिक विद्यालयात २४ ते २६ ऑगस्टदरम्यान १९ वर्षांखालील तालुका शालेय कबड्डी स्पर्धा खेळविण्यात आल्या. या स्पर्धेत १९ वर्षापेक्षा अधिक वयोगटातील खेळाडू उतरविण्यात आल्याने खेळाडू व त्यांच्या पालकांनी संताप व्यक्त केला. याबाबत पालक नूर मोहम्मद शेख यांनी मैदानातच संयोजकांकडे तक्रारही केली. १९ वर्षे वयोगटाखालील कबड्डी सामन्यात कापसे पाटील विद्यालयाच्या संघात जास्त वयाचे विद्यार्थी खेळत असल्याचे लक्षात आल्यानंतर ही बाब प्राथमिक स्तरावरील अध्यक्ष व संयोजकांच्या लक्षात आणून देत ५०० रूपये शुल्क भरुन त्याबाबत हरकत घेण्यात आली. पण याची संयोजकांनी दखल न घेता जाणूनबुजून वयोगटात न बसणार्‍या खेळणार्‍या विद्यार्थ्यांना खेळण्यास चाल दिली. त्यामुळे पात्र खेळाडूंना जास्त वयाच्या अपात्र खेळाडूंकडून पराभव स्वीकारावा लागला. संयोजकांच्या मनमानीमुळे पात्र होतकरू खेळाडूंना मनस्ताप सहन करावा लागला. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी जिल्हा क्रीडाधिकार्‍यांकडे करण्यात आली आहे.
दरम्यान कबड्डी स्पर्धेपूर्वी झालेल्या श्रीरामपूर तालुका शालेय क्रिकेट स्पर्धेच्या सामन्यातही संयोजकांच्या मनमानीचा होतकरू नवोदित क्रिकेटपटूंना फटका बसला. एका सामन्यात प्रतिस्पर्धी संघाचा एक गोलंदाज फेकी गोलंदाजी करीत असल्याची तक्रार फलंदाजी करणार्‍या संघातील खेळाडूंसह त्यांच्या संघ व्यवस्थापक, शिक्षकांनी केली. पण त्याचीही दखल न घेता गोलंदाजांनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये भाग घेतला असून तेथे त्यांच्यावर आक्षेप घेतला नाही. आता येथेच आक्षेप कसा काय घेता? असे म्हणत स्थानिक संयोजकांनी आक्षेप घेणार्‍यांची दखल न घेता सामने पुढे खेळविणे पसंत केले. (प्रतिनिधी)


Web Title: School cricket, kabaddi competition arbitrarily

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.