स्कूल बस अपघात; बळींची संख्या ठाऊक नाही
By Admin | Updated: December 16, 2014 04:48 IST2014-12-16T04:48:40+5:302014-12-16T04:48:40+5:30
गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत स्कूल बसच्या अपघातांमध्ये नेमक्या किती शाळकरी मुलांचा बळी गेला,
स्कूल बस अपघात; बळींची संख्या ठाऊक नाही
जयशंकर गुप्त, नवी दिल्ली
गेल्या वर्षी राजधानी दिल्लीत स्कूल बसच्या अपघातांमध्ये नेमक्या किती शाळकरी मुलांचा बळी गेला, याची सरकारला माहिती नाही. केंद्र सरकार दिल्लीत स्कूल बस अपघातांमुळे किती मुलांचा जीव गेला, याबाबतची आकडेवारी दिल्ली पोलिसांकडून गोळा करीत आहे, असे केंद्रीय भृपूष्ठ वाहतूक आणि राष्ट्रीय महामार्ग राज्यमंत्री पोन राधाकृष्णन यांनी सोमवारी राज्यसभेत खासदार आणि लोकमत वृत्तपत्र समूहाच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा यांनी विचारलेल्या एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात सांगितले.
शाळकरी मुलांचा जीव धोक्यात घालून त्यांना शाळेत नेणे आणि शाळेतून परत आणण्यासाठी असुरक्षित वाहनांचा वापर केला जात आहे काय? मागील एका वर्षात केवळ दिल्लीमध्ये अशा अपघातांत शंभराहून अधिक मुलांना आपला जीव गमवावा लागला आहे, याची सरकारला माहिती आहे काय? दिल्लीत मागील तीन वर्षांत धडक देऊन पळून जाण्याच्या किती घटना घडल्या आणि त्याबाबत सरकारने कोणती कारवाई केली, असा प्रश्न विजय दर्डा यांनी विचारला होता.
राधाकृष्णन म्हणाले, सरकारने सर्व राज्यांना शाळकरी मुलांच्या सुरक्षित परिवहन व्यवस्थेबाबतची आपली चिंता कळविली आहे.