शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेला

By Admin | Published: January 8, 2017 11:33 PM2017-01-08T23:33:22+5:302017-01-08T23:33:22+5:30

पुणे : मित्रांसोबत खेळण्यासाठी नाल्यात उतरलेला १४ वर्षीय मुलगा पाण्याच्या प्रवाहासोबत डे्रनेज चेंबरमध्ये वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी पावणेअकराला दांडेकर पुलाजवळील अंबिल ओढा नाल्यामध्ये घडली. अग्निशामक दल आणि सांडपाणी विभागाकडून या मुलाचा शोध सुरु करण्यात आला असून सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.

The school boy was carried away in the Nala | शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेला

शाळकरी मुलगा नाल्यात वाहून गेला

googlenewsNext
णे : मित्रांसोबत खेळण्यासाठी नाल्यात उतरलेला १४ वर्षीय मुलगा पाण्याच्या प्रवाहासोबत डे्रनेज चेंबरमध्ये वाहून गेल्याची घटना शनिवारी सकाळी पावणेअकराला दांडेकर पुलाजवळील अंबिल ओढा नाल्यामध्ये घडली. अग्निशामक दल आणि सांडपाणी विभागाकडून या मुलाचा शोध सुरु करण्यात आला असून सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता.
गणेश किशोर चांदणे (वय १४, रा. अंबिल ओढा वसाहत, दांडेकर पूल) असे त्याचे नाव आहे. तो मनपाच्या शाळेमध्ये सातवीमध्ये शिकत होता. त्याचे आईवडील मोलमजुरी करतात. अंबिल ओढ्यामध्ये दांडेकर पुलाजवळ एक दहा गुंठ्याची जागा सपाट करण्यात आलेली आहे. या ठिकाणी गणेश त्याच्या मित्रांसह खेळत होता. त्यावेळी पाण्यामध्ये जाऊन गाळात अडकलेला चेंडू काठीच्या सहाय्याने काढत असताना अचानक पाण्याचा प्रवाह वाढला. पाय घसरल्यामुळे खाली पडलेला गणेश प्रवाहासोबत वाहात चेंबरपर्यंत गेला. चेंबरला पाडलेल्या मोठ्या भगदाडामधून तो खाली पडला. डे्रनेज पाईपमधून तो वाहात गेल्याची शक्यता अग्निशमन दलाच्या सूत्रांनी वर्तविली आहे. (प्रतिनिधी)

-----

Web Title: The school boy was carried away in the Nala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.