जीवनदायीतील रुग्णालयांची संख्या वाढणार दुष्काळग्रस्त असलेल्या राज्यभरातील १४ जिल्ांसाठीच योजना
By admin | Updated: February 3, 2016 00:28 IST
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत आजघडीला जिल्ातील एकुण ११ रुग्णालयांचा समावेश आहे़ या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ३५ हजारावर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ त्यात आता दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ांमध्ये जीवनदायी योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत घोषणा करण्यात आली असून त्या अंतर्गत नांदेड जिल्ातील १६ रुग्णालयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत़ त्यामध्ये कॅन्सर हॉस्पीटलचाही समावेश आहे़
जीवनदायीतील रुग्णालयांची संख्या वाढणार दुष्काळग्रस्त असलेल्या राज्यभरातील १४ जिल्ांसाठीच योजना
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत आजघडीला जिल्ातील एकुण ११ रुग्णालयांचा समावेश आहे़ या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ३५ हजारावर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ त्यात आता दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ांमध्ये जीवनदायी योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत घोषणा करण्यात आली असून त्या अंतर्गत नांदेड जिल्ातील १६ रुग्णालयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविले आहेत़ त्यामध्ये कॅन्सर हॉस्पीटलचाही समावेश आहे़मराठवाडा आणि विदर्भातील दुष्काळग्रस्त असलेल्या १४ जिल्ांना झुकते माप देण्याच्या उद्देशाने राजीव गांधी जीवनदायी योजनेतील रुग्णालयांची संख्या वाढविण्याबाबत हालचाली सुरु आहेत़ त्यासाठी सध्या तयारी सुरु आहे़ त्या अंतर्गत नांदेड जिल्ातील यशोदा हॉस्पीटल, अपोलो क्रिटीकल केअर, वाडेकर हॉस्पीटल, चिद्रावार सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, चिंतामणी सुपर स्पेशालिटी हॉस्पीटल, श्री सिद्धीविनायक हॉस्पीटल, मुंड हॉस्पीटल सर्जिकल, फोनिक्स मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल, तुकामाई हॉस्पीटल, केअर ॲडव्हान्स सेंटर, मोनार्क कॅन्सर हॉस्पीटल, सुर्या बाल रुग्णालय, महिला रुग्णालय, रयत रुग्णालय, सिटी हॉस्पीटल सुपर स्पेशालिटी सेंटर, कोडगिरे हॉस्पीटल अशा एकुण १६ रुग्णालयांनी शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे़ त्यातील ७ रुग्णालयांचे प्रस्ताव स्विकारण्यात आले असून ९ रुग्णालयांच्या प्रस्तावात मात्र त्रुटी आढळल्या आहेत़ यामध्ये कॅन्सर हॉस्पीटलचाही समावेश करण्यात आला असल्यामुळे कॅन्सरच्या रुग्णांनाही या योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळू शकतील़ पाठविलेल्या १६ रुग्णालयांच्या प्रस्तावापैकी गरजेनुसार योजनेसाठी रुग्णालयांची निवड करण्यात येणार आहे़ चौकट- योजनेअंगर्त आतापर्यंत ५२४ शिबीरेराजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत २ जुलै २०१२ ते नोव्हेंबर २०१५ या काळात जिल्हाभरात एकुण ५२४ आरोग्य शिबीरे घेण्यात आली आहेत़ त्यामध्ये ८३ हजार ३५६ रुग्णांची तपासणी करण्यात आली असून त्यातील ६ हजार ९२७ रुग्णांना पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले आहे़चौकट- कॅन्सरच्या रुग्णांना नांदेडातच उपचार- जीवनदायी योजनेत नव्याने समाविष्ट होणार्या रुग्णालयांमध्ये मोनार्क या कॅन्सर हॉस्पीटलचाही प्रस्ताव पाठविण्यात आला आहे़ कॅन्सरच्या उपचारासाठी सध्या नांदेडच्या रुग्णांना औरंगाबाद गाठावे लागते़ मोनार्कचा योजनेत समावेश झाल्यानंतर कॅन्सरच्या रुग्णांची मोठी सोय होणार असून त्यांना नांदेडातच उपचार मिळतील़ या रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या रुग्णांना केमोथेरेपी, रेडीएशन, सर्जरी आदि उपचार मिळू शकतील अशी माहिती योजनेचे समन्वयक डॉ़विलास सर्जे यांनी दिली़