शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

एक व्यक्ती एकाच राज्यात घेऊ शकते एससी/एसटी आरक्षणाचा लाभ- सुप्रीम कोर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2018 16:14 IST

एससी/एसटी आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

नवी दिल्ली: अनुसूचित जाती आणि जमातीच्या आरक्षणाबद्दलसर्वोच्च न्यायालयानं महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. अनुसूचित जाती/जमातीच्या व्यक्तींना एकाच राज्यात आरक्षणाचा लाभ घेता येईल, असा आदेश न्यायालयानं दिला आहे. अनुसूचित जाती/जमातीत येणारी व्यक्ती केवळ एकाच राज्यात आरक्षणाचा लाभ घेऊ शकते. त्या व्यक्तीला दुसऱ्या राज्यात आरक्षणाचा लाभ घेता येणार नाही, असं न्यायालयानं आदेशात म्हटलं आहे. अनुसूचित जाती/जमातींसाठी संपूर्ण देशभरात आरक्षण लागू करता यावं, यासाठी नियमांचा विचार करायला हवा. अनुसूचित जाती/जमातीत मोडणाऱ्या व्यक्तीला आरक्षणाचा लाभ केवळ एका राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात घेता येईल, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एखाद्या राज्यात वास्तव्यास असणारी व्यक्ती अनुसूचित जाती/जमातीची असेल, तर तिला त्या राज्यातील आरक्षणाचा लाभ घेता येईल. जोपर्यंत दुसऱ्या राज्यानं त्या जातीला आरक्षण दिलं नसेल, तोपर्यंत संबंधित व्यक्तीला आरक्षणाचा लाभ मिळणार नाही, असं न्यायालयानं स्पष्ट केलं. एखाद्या राज्यात आरक्षणाचा लाभ घेणारी अनुसूचित जाती/जमातीमधील व्यक्ती दुसऱ्या राज्यात आरक्षणाचा लाभ घेऊ शकते का, असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयासमोर होता. मात्र असं होऊ शकत नसल्याचं सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. कोणत्याही राज्यातील सरकार स्वत:च्या मर्जीप्रमाणे अनुसूचित जाती आणि जमातींच्या यादीत बदल करु शकत नाही. हा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. किंवा राज्य सरकारं संसदेच्या सहमतीनं यादीत बदल करु शकतात, असं न्यायालयानं म्हटलं आहे.  

टॅग्स :SC STअनुसूचित जाती जमातीreservationआरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय