शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक! नेपाळ्यांचा भारतीय सीमेत घुसून हल्ला; वनविभागाच्या पाच चौक्या जाळल्या
2
उद्याची सकाळ दरवाढीच्या झटक्यांची; टोलनंतर आता अमूलचे दूध २ रुपयांनी महागले
3
लोकसभेचे मतदान संपताच टोल दरात मोठी वाढ; आज मध्यरात्रीपासून लागू करण्याचे आदेश
4
जगन मोहन रेड्डींची खुर्ची धोक्यात; आंध्र प्रदेशच्या एक्झिट पोलनुसार भाजपा सत्तेत येण्याची दाट शक्यता
5
महत्वाचा अलर्ट! आयकर विभागाची L&T वर कारवाई; उद्या शेअर बाजारावर परिणाम होण्याची शक्यता 
6
"होय, मला भारताचा कोच व्हायला आवडेल, यापेक्षा मोठा...", गौतम गंभीरनं सोडलं मौन
7
ओडिशा विधानसभेत BJP आणि BJD यांच्यात टाय; दोन्ही पक्षांना 62-80 जागा मिळण्याची शक्यता
8
'देश वाचवण्यासाठी पुन्हा तुरुंगात जातोय; Exit Poll वर विश्वास ठेवू नका'- अरविंद केजरीवाल
9
एक्झिट पोल जाहीर होताच भाजपात गेलेल्या आप आमदाराने राजीनामा मागे घेतला
10
"संघाच्या शाखेत जाऊनही मी डाव्या विचारसरणीचा कारण...", आशुतोष गोखलेने मांडले राजकीय विचार
11
"एक्झिट पोलमध्ये अटलजी, पण पंतप्रधान बनले मनमोहन सिंग", काँग्रेस नेत्याचा मोठा दावा
12
सिक्कीमध्ये सत्ताधारी SKM चा दणदणीत विजय; भाजपचे सर्व उमेदवार पराभूत
13
अदा शर्मा सुशांतसिंह राजपूतच्या फ्लॅटमध्ये झाली शिफ्ट, म्हणाली, "या घरात मला..."
14
एनडीए ३९७ पार! एक्झिट पोलनंतर लगेचच e-मतदानाचा निकाल आला; पहा महाराष्ट्रात काय परिस्थिती?
15
"निवडणुकीआधी उद्धव ठाकरेंनी मोदींकडे भेटीची वेळ मागितली होती", शिंदे गटातील नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
16
११ हजार कोटींच्या संपत्तीवरून वाद... आईने भावाला मारहाण केल्याचा ललित मोदींचा आरोप
17
आज ठाकरेंना नऊ जागा दाखवत असतील...; अजित पवार गटाला शून्य जागेवरून राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा मोठा दावा
18
"निकालानंतर २० दिवसातच उद्धव ठाकरे मोदींसोबत..."; आमदार रवी राणांचा मोठा गौप्यस्फोट
19
इलेक्शन ड्युटीवरील कर्मचाऱ्यांसाठी काळ बनला सूर्य; 58 जणांचा मृत्यू, सर्वाधिक 'या' राज्यात...
20
"ज्या शाळेत शिकलात ती काँग्रेसने बांधलीय"; नाना पटोलेंचा संजय राऊतांना खोचक टोला

अॅट्रॉसिटी कायद्यासंदर्भातील केंद्राची फेरविचार याचिका मंजूर; आज सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 12:04 PM

केवळ अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय बदलायची कोणतीही गरज नाही.

नवी दिल्ली: दलित अत्याचार विरोधी कायद्यावरून देशातील वातावरण तापले असताना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी केंद्र सरकारची यासंदर्भाती फेरविचार याचिका मंजूर केली. त्यामुळे आज दुपारी दोन वाजता या प्रकरणावर तातडीची सुनावणी होणार आहे. यासाठी सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल आणि न्यायमूर्ती यू यू लळित यांच्या अध्यक्षतेखाली खंडपीठ स्थापन केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाशी सरकार सहमत नाही. या निर्णयाचा व्यापक आढावा घेण्यासाठी सरकारने याचिका दाखल केलेली आहे, असे केंद्रीय कायदेमंत्री रवीशंकर प्रसाद यांनी काल स्पष्ट केले होते. दलित संघटनांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाने अनेक ठिकाणी हिंसक स्वरूप धारण केले होते. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने सुनावणी व्हावी, अशी मागणी केंद्र सरकारने केली होती. सुरूवातीला सर्वोच्च न्यायालय याबाबत फारसे अनुकूल नव्हेत. केंद्र सरकारच्या वतीने अॅटर्नी जनरल के के वेणुगोपाळ यांनी बाजू मांडली. यावेळी त्यांनी न्यायालयासमोर देशात सध्या उद्भवलेली परिस्थिती मांडली. ही एक प्रकारची आणीबाणीची परिस्थिती आहे. आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला आहे तर मोठी वित्तहानीही झाली आहे. त्यामुळे या प्रकरणावर तातडीने सुनावणी व्हावी, असा युक्तिवाद अॅटर्नी जनरल यांनी केला होता. ही मागणी मान्य करत सर्वोच्च न्यायालयाने आज दुपारी 2 वाजता या प्रकरणाची सुनावणी घेण्याचे मान्य केले.

सूत्रांच्या माहितीनुसार हे प्रकरण सरन्यायाधीशांच्या खंडपीठाकडे पाठवले जाऊ शकते. अमायकस क्युरी अनरेंद्र शरण यांनी मात्र या सगळ्यावर आक्षेप घेतला आहे. केवळ अशी परिस्थिती उद्भवल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपला निर्णय बदलायची कोणतीही गरज नाही. त्यामुळे आज न्यायालय केवळ यासंदर्भातील बाजू ऐकून घेईल, अशी शक्यता आहे. परंतु, या काळात कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळण्याची जबाबदारी सरकारचीच असेल.अ‍ॅट्रॉसिटी कायद्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानंतर हा कायदा सौम्य झाल्याचे सांगत, देशभरातील अनेक दलित संघटना सोमवारी रस्त्यावर उतरल्या. त्यांनी पुकारलेल्या ‘भारत बंद’ला अनेक ठिकाणी हिंसक वळण लागले. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ आणि दगडफेक केली. काही ठिकाणी पोलिसांना गोळीबारही करावा लागला. या हिंसाचारात 10 जण ठार झाले. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, बिहार आणि पंजाबनंतर महाराष्ट्रातही काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागले होते.

टॅग्स :Atrocity Actअॅट्रॉसिटी कायदाBharat Bandhभारत बंदSupreme Courtसर्वोच्च न्यायालय