दिल्लीतील कचराप्रश्नी सुप्रीम कोर्टाने नायब राज्यपालांना फटकारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2018 15:44 IST2018-07-12T15:12:39+5:302018-07-12T15:44:15+5:30
राजधानी दिल्लीतील कचरा व्यवस्थापनावरुन सुप्रीम कोर्टाने नायब राज्यपाल अनिल बैजल यांना फटकारले आहे. गुरुवारी नायब राज्यपालांकडून सप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

दिल्लीतील कचराप्रश्नी सुप्रीम कोर्टाने नायब राज्यपालांना फटकारले
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील कचरा व्यवस्थापनावरुन सुप्रीम कोर्टाने नायब राज्यपाल अनिल बैजल यांना फटकारले आहे. गुरुवारी नायब राज्यपालांकडून सप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.
नायब राज्यपालांनी कचरा व्यवस्थापनासाठी दिल्ली महानगरपालिकेला जबाबदार आहे. तसेच याप्रकरणी बैठका घेण्यात घेत आहेत. यासाठी त्यांनी कलम 239AAचा हवाला दिला आहे. यावरुन सुप्रीम कोर्टाने नाराजी व्यक्त करत म्हणाले की, तुम्ही 25 बैठका घेत आहात किंवा 50 कप चहा पित आहात. याच्याशी काहीही संबंध नाही आहे.
सुप्रीम कोर्टात सुनावणीच्यावेळी नायब राज्यपालांकडून सादर करण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले की, दिल्लीच्या पूर्वेकडीलगाजीपूर, दक्षिणेकडील ओखला आणि उत्तरेकडील भलस्वा भागात कचरा-याचे ढिग आहेत. यासंबंधी नायब राज्यपालांकडून आपल्या स्तरावर बैठका घेत आहे.
यावर, सुप्रीम कोर्टाने सांगितले की, कच-याचे व्यवस्थापन करण्यासाठी कारवाई करण्याची तुमची वेळ सांगा. 15 बैठका झाल्या किंवा 50 कप चहा पिला, याचा या घटनेशी काही संबंध नाही. तुम्ही नायब राज्यपाल आहात, त्यामुळे यासंबधी टाइमलाइन आणि स्टेटस रिपोर्ट द्या. तसेच, या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे बोट करु नका.