शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

के.एम. जोसेफ यांच्या नियुक्तीवर न्यायवृंद ठाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2018 21:30 IST

न्यायवृंद आपल्या प्रस्तावावर ठाम राहिल्यास न्या. जोसेफ यांच्या नियुक्तीला मान्यता देणे केंद्र सरकारला भाग पडेल.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृदांच्या शुक्रवारी झालेल्या बैठकीत उत्तराखंडचे मुख्य न्यायाधीश यांना सर्वोच्च न्यायालयात बढती देण्याच्या शिफारसीवर ठाम राहण्याचा निर्णय घेण्यात आला. न्या. जोसेफ यांच्या या नियुक्तीचा प्रस्ताव केंद्राने नाकारला होता. यामुळे केंद्र सरकार व न्यायपालिकेच्या कारभारावर अनेकांनी बोट ठेवले होते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृदांच्या शुक्रवारच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या न्यायवृंदात सरन्यायाधीश दिपक मिश्रा, न्या. जे. चेलमेश्वर, न्या. रंजन गोगोई, न्या. एम.बी. लोकूर आणि कुरियन जोसेफ यांचा समावेश आहे. न्यायवृंदाची आजची बैठक सुमारे तासभर चालली. या बैठकीअंती न्यायवृंदाने के.एम. जोसेफ यांच्या नियुक्तीवर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्याचवेळी सर्वोच्च न्यायालयातील नियुक्तीसाठी अन्य न्यायाधीशांची नावेही सुचवण्याचे ठरवल्याचे न्यायवृंदाने आपल्या ठरावात म्हटले आहे. येत्या 16 तारखेला यासंदर्भात आणखी एक बैठक होईल. या बैठकीनंतरही न्यायवृंद आपल्या प्रस्तावावर ठाम राहिल्यास न्या. जोसेफ यांच्या नियुक्तीला मान्यता देणे केंद्र सरकारला भाग पडेल. न्या. जोसेफ यांना सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून बढती द्यावी अशी न्यायवृंदाने केलेली शिफारस २६ एप्रिल रोजी सरकारने न्यायवृंदाकडे फेरविचारार्थ पाठविली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निकषातील हा प्रस्ताव नाही आणि सर्वोच्च न्यायालयात केरळला पुरेसे प्रतिनिधित्व देण्यात आले आहे, असे सरकारने म्हटले होते. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती करण्यासाठी सरकारने त्यांच्या ज्येष्ठतेबाबतचा प्रश्नही उपस्थित केला होता. 

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयcongressकाँग्रेस